नवी दिल्ली | 2005 साली लालकृष्ण अडवाणी पाकिस्तानला गेले होते, त्यावेळी त्यांनी पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्ना यांना धर्मनिरपेक्ष म्हटलं होतं. यावरून त्यांना भाजप अध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आली होती. असं उदाहरण देत उत्तर प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष जे. पी. राठोड यांनी कार्यकर्त्यांची शाळा घेतली.
भाजपकडून पदाधिकारी आणि कार्येकर्त्यांना पक्षाच्या विचारधारेबद्दल मार्गदर्शनपर शिबीरं घेतली जात आहेत. विचारधारेशी प्रामाणिक रहा अन्यथा परिणाम भोगा, अशा सूचना भाजपकडून प्रशिक्षणादरम्यान देण्यात आल्या आहेत.
पक्षविचारधारेशी एकनिष्ठ रहा नाही तर अडवाणी यांच्या सारखी वेळ तुमच्यावरही येऊ शकते, असा इशाराच राठोड यांनी दिला आहे.
दरम्यान, पक्षविरोधी काम केल्यावर भाजप आगामी काळात काय अॅक्शन घेऊ शकतं, असा इशाराच एकप्रकारे जे. पी. राठोड यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या-
Comments are closed.