बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘जात साली जात साली जाता जाता जात नाय’; अवधूत गुप्तेंचं गाणं वर्षभराने व्हायरल

मुंबई | सोशल मीडियावर पोस्ट केलेली पुन्हा कधी व्हायरल होईल हे सांगता येत नाही. प्रसिद्ध गायक अवधुत गुप्ते यांच्या बाबतीत असंच काही घडलं आहे. अवधुत गुप्ते यांनी वर्षभरापूर्वी ‘जात’ या विषयावर भाष्य करणार रॅप गायल होतं. ते रॅप आता अचानक पुन्हा व्हायरल होत आहे. यासंदर्भात अवधूत गुप्ते यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहीली आहे.

एखादं गाण कधी ,केव्हा आणि कोणामुळे लोकांपर्यत पोहोचेल हे सांगता येत नाही, असं अवधूत गुप्ते यांनी इंन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे. तसेच जात हे रॅप मी मागच्या वर्षी केलं. परंतु, आता कोल्हापुरचे कुलदीपजी कुंभार साहेब यांच्या कानावर ते आता पडलं ,असं अवधूत गुप्ते यांनी म्हटलं आहे.

अवधूत गुप्ते यांच्या जात या गाण्याचे युट्यूबवर व्हूव्ज देखील वाढले आहेत. अवधूत गुप्ते यांनी म्हटलं आहे की, कुलदीप कुंभार साहेब यांनी मला फोन केला आणि हे गाण जास्त लोकांपर्यंत पोहोचायला हवं आणि मी त्यासाठी प्रयत्न करतो आहे, असं ते म्हणाल्याचं अवदूत गुप्ते यांनी सांगितलं आहे.

या पोस्टमध्ये अवधूत गुप्ते यांनी जात नावाची किड समाजाच्या पिकाला लागलेली आहे आणि कीड वरवरची नाही तर ती मातीत खोलवर रूजलेली आहे. त्यासाठी एक गाणे पुरेसे नाही परंतु आपण प्रयत्न करत राहू, असंही अवधुत गुप्ते यांनी म्हटलं आहे.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

राज्याच्या कोरोना आकडेवारीत चढ-उतार, वाचा आजची ताजी आकडेवारी

मुंबईच्या कोरोना आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात घट, वाचा आजची आकडेवारी

पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

‘राजकारण्यांनी तुमच्या हातात बंदुका दिल्या, हिंमत असेल तर…’; ‘त्या’ मुलीचं दहशतवाद्यांना खुलं आव्हान

“तुम्ही शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या घातल्या, आता शेतकरी तुमच्या पक्षावर नांगर फिरवतील”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More