बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ कारणामुळे शेतकऱ्यानं शेतात लावला चक्क सनी लिओनीचा पोस्टर!

मुंबई | बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिओनी सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते. आपल्या नृत्य आणि अदांनी प्रेक्षकांवर भूरळ घालणाऱ्या सनीचे अनेक चाहते आहेत. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असते. सनीची तर चर्चा होतच असते मात्र आता सनीच्या एका अनोख्या चाहत्याची चर्चा सोशल मीडियावर होत असलेली पाहायला मिळत आहे.

सनीचा हा अनोखा चाहता आंध्रप्रदेशच्या नेल्लोर जिल्ह्यातला असून त्याच्या एका भन्नाट आयडीयामुळे तो चर्चेचा विषय ठरत आहे. या चाहत्याचं नाव ए चेंचू रेड्डी असून त्यांचं वय 45 वर्ष आहे. यानं चक्क आपल्या शेतातील मालाला नजर लागू नये म्हणून शेतात सनी लिओनीचा पोस्टर लावला आहे.

याविषयी बोलताना ए चेंचू रेड्डी यांनी म्हटलं की, माझ्याकडे 10 एकर शेती असून माझ्या शेतातील पीक पाहून लोकांना माझा हेवा वाटतो. माझ्या सोन्यासारख्या पीकाला कोणाची नजर लागू नये म्हणून मी शेतात सनी लिओनीचं पोस्टर लावलं आहे. यामुळे लोकांची नजर पीकाकडे न जाता सनीच्या पोस्टरवर जाईल. म्हणून मी दिशाभूल करण्यासाठी सनीचं पोस्टर लावलं आहे.

दरम्यान, हा पोस्टर सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकुळ घालताना दिसत आहे. यावर अनेकांच्या भन्नाट भन्नाट प्रतिक्रियाही पाहायला मिळत आहे. लोक कुठे डोकं लावतील आणि कोणाला काय आयडीया सुचेल याचा काही नेम नाही.

थोडक्यात बातम्या –

‘माफी मागून, 25 कोटींची भरपाई द्या’, शिल्पा शेट्टीची माध्यमांविरोधात हायकोर्टात धाव

आजी-माजी मुख्यमंत्री एकमेकांच्या समोर; कोल्हापुरात उद्धव ठाकरे अन् फडणवीसांची धावती भेट

धक्कादायक! महिला डाॅक्टरला तब्बल तीन वेळा झाली कोरोनाची लागण

‘तुम्ही कसल्या कायदा सुव्यवस्थेच्या गप्पा मारताय?’; संजय राऊत आक्रमक

बाॅक्सिंगमध्ये भारताचं पदक निश्चित; लवलीना बोर्गोहेनची दमदार कामगिरी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More