बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पाहावं ते नवलंच! जॅकलीन फर्नांडीसची हुबेहुब कार्बन काॅपी आहे ‘ही’ अभिनेत्री

मुंबई | असं म्हटलं जातं की जगात आपल्या सारखेच दिसणारे सात लोक असतात. म्हणजेच आपल्या सात कार्बन काॅपी आहेत असंच. अशातच अनेक वेळा कलाकारांचे हुबेहुब कार्बन काॅपी असणारे लोक समोर येतात. मात्र अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीसच्या बाबतीत जरा वेगळंच घडलं. जॅकलीन सारखी हुबेहुब दिसणारी स्त्री दुसरी कोणी नसून ती देखील एक अभिनेत्री आहे.

जर्मनीमध्ये अभिनय क्षेत्रात काम करणारी अभिनेत्री अमेंडा ही हुबेहुब जॅकलीन सारखी दिसायला आहे. तिचा लुक, तिची शरीर रचना, तिचं राहणीमान हे देखील अगदी जॅकलीन सारखंच आहे. त्यामुळे भारतातील अनेक लोक देखील अमेंडाला इन्स्टाग्रामवर फाॅलो करतात.

अमेंडा आणि जॅकलीन दोघी एकमेकींना भेटल्या आहेत. त्यानंतर दोघी हुबेहुब दिसत असल्याची चर्चा रंगली. अमेंडाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर असे अनेक फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिचा लुक एकदम जॅकलीनची कार्बन काॅपी दिसतो.

दरम्यान, जॅकलीन तिच्या फोटोंमुळे आणि बोल्ड अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते. तर अमेंडा देखील बोल्ड अंदाजात लोकांसमोर येते. त्यामुळे जॅकलीन आणि अमेंडा केवळ दिसायलाच नाही तर अनेक गोष्टींमध्ये सारख्याच आहेत.

पाहा फोटोः

थोडक्यात बातम्या-

क्रेडीट कार्डवर मिळणारे ‘हे’ फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

इंधन दरवाढीला अखेर लगाम, जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे ताजे दर

“इंधन दरवाढीविरूद्ध आंदोलन करणारे कोणत्या बिळात लपुन बसले आहेत?”

राज्यातील कॉलेज उद्यापासून सुरू, मात्र या नियमांचं करावं लागणार पालन, वाचा सविस्तर

“सत्ता गेल्यावर कुणाचा तोल जातो तर कुणी भ्रमिष्ट होतं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More