“सुकेश चंद्रशेखरने माझं आयुष्य बरबाद केलं”
नवी दिल्ली | मनी लाॅड्रिंग प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन (Jacqueline) फर्नांडिसची डोकेदुखी वाढतच चालली आहे. 200 करोडच्या मनी लाॅड्रिंग प्रकरणात तिला अटक करण्यात आली होती. याप्रकरणी केस कोर्टात सुरु आहे. याविषयी जॅकलिनने आज पटियाला कोर्टात जबाव नोंदवला आहे. यावेळी तिनं मोठा खुलासा केल्याचं पहायला मिळालं. कोर्टात जॅकलिनने सुकेश विरोधात जबाव दिला आहे.
सुकेश चंद्रशेखरने माझं आयुष्य बरबाद केलं. तो माझ्या भावनांशी खेळला. तो माझा खूप मोठा फॅन (Fan) आहे. त्याला माझ्यासोबत दक्षिणात्य चित्रपटसृष्टीत काम करायचं आहे असं त्यानं मला सांगितलं होतं. दिवसातून तीन-चार वेळा आमचा व्हिडीओ कॅाल होत असे.
तो जेलमधून मला व्हिडीओ काॅल करायचा हे मला अजिबात माहित नव्हतं. तो कोणत्यातरी कोपऱ्यातून काॅल करायचा. त्याच्या पाठीमागे मला सोफा आणि पडदे दिसायचे असा खुलासा जॅकलिनने केला आहे. जय ललिता (Jai Lalitha) आपली मावशी असल्याचं देखील त्यानं जॅकलिनला सांगितल्याचं ती म्हणाली.
यावेळी जॅकलिनने सुकेश चंद्रशेखर आणि तिची ओळख ही खोट्या माहितीवर झाल्याचं सांगितलं. सुकेश हा सरकारी अधिकारी असल्याची तिला माहिती होती. पिंकी इराणीने जॅकलिनला हे देखील पटवून दिलं की तो गृहमंत्रालयात (Ministry of Home Affairs) अधिकारी आहे. त्यावेळी सुकेशने आपण सन टिव्हीचे टिव्हीचा मालक असल्याचं म्हणाला होता.
सुकेशने आपलं खरं नाव लपवलं होतं. त्यांन आपलं खरं नाव शेखर सांगितल्याचं ती म्हणाली. 8 ऑगस्ट (August) 2021 ला आपलं शेवटचं बोलणं झाल्याचं ती म्हणाली. ते बोलणं फोनवर झालं होते. पिंकीला त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबद्दल कळल्यानंतरही तिनं सांगितलं नसल्याचं जॅकलिनने कोर्टात सांगितलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Comments are closed.