बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चेन्नईच्या विजयानंतर जडेजाचं भन्नाट सेलिब्रेशन; व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

मुंबई | आयपीएल हंगामातील 12 वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळण्यात आला. मुंबईच्या वानखेडेवर हा सामना झाला. या सामन्यात चेन्नईच्या फिरकीपटू पुढे राजस्थानची फलंदाजी पुर्णपणे ढासळली. तर या सामन्यात अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने चांगली कामगिरी केली. त्यातच त्याने घेतलेल्या 4थ्या झेलनंतर त्यांचं हटके सेलिब्रेशन पहायला मिळालं.

चेन्नई विजयाच्या तोंडावर असताना शेवटचं षटक टाकण्यासाठी महेंद्रसिंग धोनीने चेंडू शार्दुल ठाकूरकडे सोपवला. षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर राजस्थानच्या जयदेव उनटकटने लाॅग ऑफच्या दिशेने जोरदार फटका मारला. पण शार्दुलने उसळणारा चेंडू टाकल्याने चेंडू हवेत जास्तवेळ राहिला. त्यामुळे बॉन्ड्री लाईनवर रविंद्र जडेजाने सुंदर झेल पकडला. त्यानंतर त्याचं सेलिब्रेशन पहायला मिळालं आहे.

त्याने डगआऊटच्या दिशेने 4 झेल घेतल्याचा इशारा केला. तर फोन करून सांगा असा इशारा देखील केला. चेन्नईच्या डगआऊटने देखील त्याला रिस्पाॅन्स दिला. त्याने 4 षटकात 28 धावा देत 2 गडी बाद केले. तर त्याने या सामन्यात 4 अप्रतिम झेल पकडले होते. त्याचबरोबर बॉन्ड्री लाईनवर त्याने अनेक चौकर देखील अडवले होते.

दरम्यान, चेन्नईच्या गोलंदाजांनी सामन्यात जोरदार पुनरागमन केलं. मोईन अलीने 3 षटकात केवळ 7 धावा देत 3 गडी बाद केले होते. त्यामुळे राजस्थानला 143 धावा करता आल्या. त्याचबरोबर हा सामना चेन्नई ने 45 धावांनी जिंकला. हा सामना जिंकून चेन्नईने अंकतालिकेत उसळी घेतली आहे.

पाहा व्हिडीओ-

 

थोडक्यात बातम्या-

देशातील पहिल्या ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’ला अनिल परबांनी दाखवला हिरवा झेंडा

“देवेंद्र फडणवीसांच्या 45 वर्षांपेक्षा कमी वयाच्या पुतण्याला लस मिळतेच कशी?”

…म्हणून उद्धव ठाकरेंनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार!

चेन्नईचा राजस्थानवर सुपर विजय, गुणतालिकेत घेतली भरारी

…म्हणून या सीझनला आत्तापर्यंत हार्दिक गोलंदाजी करताना दिसला नाही’; मुंबईच्या गोटातून महत्त्वाची माहिती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More