Jagan Mohan Reddy | विशाखापट्टणममधील रुशीकोंडा टेकडीवरील आलिशान पॅलेसमुळे आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी अडचणीत सापडले आहेत. सत्ताधारी टीडीपीने त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.त्यामुळे आंध्र प्रदेशच्या राजकारणात सध्या हिल पॅलेस चर्चेत आलंय.
जगन मोहन रेड्डी यांनी रुशीकोंडा टेकडीवर 500 कोटी रुपयांचे हे आलिशान पॅलेस मोठे बॅरिकेड्स लावून ते लपविण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप टीडीपीने केला आहे. इतकंच नाही तर, त्यात सर्वाधिक खर्च हा 40 लाख रुपये किमतीचा बाथटब बनवण्यात आल्याचंही टीडीपीने म्हटलं आहे.
जगनमोहन रेड्डी यांच्यावर गंभीर आरोप
विशेष म्हणजे फक्त कमोड बनवण्यासाठी 12 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. या आलिशान पॅलेसमध्ये फर्निचरसह सुसज्ज स्पा रूम आणि अगदी उच्च दर्जाचे मसाज टेबलदेखील आहेत. आंध्र प्रदेश 12 लाख कोटी रुपयांच्या कर्जात बुडाला असताना माजी मुख्यमंत्र्यांनी या बांधकामाचे कंत्राट त्यांचेच नातेवाईक देवी रेड्डी श्रीनाथ रेड्डी यांना दिले असल्याचा देखील आरोप करण्यात आला आहे.
रेड्डी (Jagan Mohan Reddy) यांचं हे पॅलेस 9.88 एकरमध्ये असून यात 7 आलिशान इमारतींपैकी 3 मुख्यतः निवासी इमारती आहेत. यामध्ये 12 बेडरूम असून प्रत्येक बेडरूममध्ये लग्झरी वॉशरूमची व्यवस्था आहे. त्यात सर्व प्रकारच्या लक्झरी सुविधा, उच्च दर्जाचे फर्निचर, फर्निशिंग आहे. मात्र, या सर्व कामासाठी जनतेचा पैसा वापरण्यात आल्याचा आरोप टीडीपीने केला आहे.
आलिशान ‘रुशिकोंडा पॅलेस’ची राज्यभर चर्चा
यामुळे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी हे अडचणीत सापडले आहेत.या संदर्भात टीडीपीकडून अनेक ट्विट करण्यात आली आहेत. विशाखापट्टणममधल्या टेकडीवर गुपचूप जनतेच्या पैशांतून हा पॅलेस बांधण्यात आला असल्याचं टीडीपीने म्हटलं आहे.
या आरोपांना आता जगन रेड्डी यांच्या वायएसआरसीपी पक्षाचे नेते आणि माजी मंत्री जी. अमरनाथ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
“टीडीपी जनतेला चुकीची माहिती सांगत आहे. टीडीपी राज्यातल्या जनतेची मानसिकता बदलण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. रुशीकोंडा टेकडीवरील इमारती सरकारी आहेत. ती कोणाची खासगी मालमत्ता नाही. विशाखापट्टणमला मिळत असलेलं महत्त्व लक्षात घेऊन या इमारती बांधण्यात आल्या आहेत.”, असं वायएसआरसीपी पक्षाचे नेते आणि माजी मंत्री जी. अमरनाथ यांनी म्हटलं आहे. त्यामुळे सध्या राजकारणात ‘रुशिकोंडा पॅलेस’ आणि जगनमोहन रेड्डी (Jagan Mohan Reddy) चर्चेत आले आहेत.
News Title- Jagan Mohan Reddy in discussion for 500 crore palace
महत्त्वाच्या बातम्या –
‘आम्हाला भिडवत ठेवलं तर… ‘; मनोज जरांगेंचा थेट देवेंद्र फडणवीसांना इशारा
बहुचर्चित ‘मुंज्या’चा थरार आता ओटीटीवर दिसणार; कधी आणि कुठे पाहणार?
“हिंमत असेल तर…”, संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना दिलं चॅलेंज
यंदा वटपौर्णिमा 4 दुर्मिळ योगायोगाने साजरी करा; होणार दुहेरी लाभ
रिल्सच्या नादात जीवघेणा स्टंट; तरूणीचा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ व्हायरल