नवी दिल्ली | आंध्र प्रदेशचे भावी मुख्यमंत्री आणि वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी ‘आंध्र सदन’मध्ये पत्रकारांशी संवाद साधला.
दारूबंदीच्या मागणीवर मी ठाम आहे. मी त्या शब्दाला जागणार आहे. विविध टप्प्या-टप्प्यांमध्ये मी राज्यात दारूबंदी करणार आहे आणि हे काम करूनच मी पुढच्या वेळी जनतेसमोर मतदान मागायला जाईन, असं जगनमोहन रेड्डी म्हणाले.
2024 ला फक्त पंचतारांकित हॉटेलमध्येच दारू विकण्याची परवानगी मिळेल. जाहीरनाम्यात ज्या ज्या घोषणा केल्या आहेत, त्या मी पूर्ण करणारच… असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
आंध्र प्रदेश राज्याला विशेष राज्याचा दर्जा द्यावा आणि आंध्र प्रदेश सरकारकडे विशेष लक्ष द्यावं, अशी मागणी मी पंतप्रधानांकडे केली आहे आणि मला आशा आहे, पंतप्रधान या सगळ्या गोष्टींकडे सकारात्मकपणे पाहतील, असं रेड्डी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
-हत्या झालेल्या कार्यकर्त्याच्या पार्थिवाला स्मृती इराणींनी दिला खांदा
-राहुल गांधींवर टीका करणाऱ्यांवर जितेंद्र आव्हाड भडकले
-दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन शरद पवार करणार मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी
-धक्कादायक! इफ्तार पार्टीला न बोलावल्याने मामेभावानेच केली 3 चिमुरड्यांची हत्या
-पंकजांनी गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना दिला उजाळा; जुना व्हीडिओ केला शेअर
Comments are closed.