बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देवेंद्र फडणवीसांचा खास माणूस झाला भाजपचा पुणे शहराध्यक्ष!

पुणे | पुणे शहर भाजपच्या अध्यक्षपदी जगदीश मुळीक यांची निवड करण्यात आली आहे. बाळा भेगडे यांनी ही घोषणा केली. त्यामुळे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खास माणूस पुणे शहराध्यक्ष झाल्याचं चित्र आहे.

बुधवारी पुणे शहर संघटन कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाजप नेते बाळा भेगडे यांनी जगदीश मुळीक यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यामुळे मुळीक यांच्याकडे आता पुणे शहराची जबाबदारी असणार आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, राज्यसभेचे खासदार संजय काकडे, उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृह नेता धीरज घाटे इत्यादी नेते यावेळी उपस्थित होते.

दरम्यान, जगदीश मुळीक हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे मानले जातात. त्यामुळे त्यांची शहराध्यक्ष पदी निवड झाल्याचं बोललं जातंय.

ट्रेंडिंग बातम्या-

मोदीजी, मी चालू तरी शकतो का? का त्यावरही बंदी आहे?- कुणाल कामरा

24व्या आठवड्यातही गर्भपात करता येणार; मोदी सरकारचा निर्णय

महत्वाच्या बातम्या-

1300 शाळा कधी बंद झाल्याच नाहीत; विनोद तावडेंचं केजरीवालांना प्रत्युत्तर

“मुनगंटीवारांनी वृक्ष लागवडीत भष्ट्राचार करुन 500 कोटींचा बंगला बांधला”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More