Top News पुणे महाराष्ट्र

राज्य सरकारमधील ‘या’ नेत्यांवर कारवाई का होत नाही?- भाजप

Photo Credit- Facebook/ Chhagan Bhujbal, Jayant Patil

पुणे | राज्यभरात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये निर्बंध लागू केले आहेत. मात्र सरकारमधील मंत्री स्वत: या नियमाची पायमल्ली करत असल्याचं दिसून येत आहे. भाजप पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी कोरोनोच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्यांचं समर्थन होणार नाही, असं म्हणत सरकारवर निशाणा साधला आहे.

सोमवारी पुण्यात भाजप नेते आणि माजी खासदार धनंजय महाडिक यांच्याविरोधात कोरोनो नियमांची पायमल्ली केल्याच्या आरोपाखआली गुन्हा दाखल झाला. यासंदर्भात यावेळी जगदीश मुळीक बोलत होते. भाजप नेत्यांवर गुन्हा दाखल केले जात आहेत. त्यांनी नियम मोडले याचे समर्थन होऊ शकत नाही, मात्र अन्य राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते नियम मोडत आहेत त्यांच्यावर कारवाई का होत नाही असा सवाल मुळीकांनी यावेळी विचारला.

नाशिकमध्ये लग्नाला हजेरी लावल्याचे फोटो व्हिडीओ व्हायरल झाले आहेत, त्यातील एक मंत्री कोविड पॉझिटीव्ह असल्याचं समोर येतंय. राज्याचे मंत्री जयंत पाटील यांचा वाढदिवस हेलिकॉप्टरमध्ये साजरा झाला, त्यानंतर त्यांचा कोविड रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याचं समोर आलं. त्या आधी त्यांचा राजकीय दौरा राज्यभर सुरु होता. त्यांच्या सभांची, कार्यक्रमांची सुरुवात विदर्भातून झाली आज तिथेच सगळ्यात जास्त कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत, अशी टीकाही जगदीश मुळीक यांनी केली आहे.

दरम्यान, काँग्रेस पक्ष मुंबईत शक्ती प्रदर्शन करतोय, रॅली काढतोय, पुण्यात राजकीय पक्षांचे मोठमोठे कार्यक्रम होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या कार्यक्रमांना सुरुवात केली आहे. या कोणावरही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे फक्त भाजपच्या नेत्यांवर सूड उगवायच्या भावनेने कारवाई करू नये, सर्वांना सारखे नियम लावावे. असं म्हणत जगदीश मुळीकांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“वाॅर्नरला हैदराबादच्या कर्णधारपदावरुन हटवा, त्याचा फिक्सिंगमध्ये सहभाग”

“कॉलर उडवणारे आणि मिशी पिळणारे घरात बसले आहेत”

जालना जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय ‘या’ तारखेपर्यंत बंद पण…

अडवाणी, अजित पवारांनी जी परंपरा पाळली ‘ती’ संजय राठोडांनीही पाळावी- सुधीर मुनगंटीवारधक्कादायक! भाजप पदाधिकाऱ्यासह चौघांनी केला वीस वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या