बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आम्ही दगडूशेठ समोर गाऱ्हाणं मांडलं म्हणून पुण्यातील निर्बंध शिथील झाले”

पुणे | पुण्यात निर्बंध कायम ठेवल्यामुळे व्यापाऱ्यांनी नाराजी दर्शवत आक्रमक पवित्रा घेतला होता. यामुळे पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी निर्बंध शिथील करण्याचा मोठा निर्णय घेतला.

मागील काही दिवसांपासून राज्यातील विविध भागातील निर्बंध उठवले जात होते पण पुणे शहरातील कोरोना परिस्थीतीमुळे सावध पवित्रा सरकारने घेतला होता. पण पुण्यातील नागरिकांची वाढत असलेली मागणी लक्षात घेऊन राज्य सरकारने काल पुण्यातील निर्बंध हे अटी आणि शर्थींसह शिथिल करण्यात येत असल्याचं जाहीर केलं.

भाजपा पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी राज्य सरकारने आमच्या आंदोलनाला घाबरून हा निर्णय घेतल्याचं ते म्हणाले आहेत. आम्ही दगडूशेठ हलवाईला प्रार्थना केल्यामुळेच हा निर्णय झाला असंही ते म्हणाले. मागील दीड वर्षापासून पुण्याचं जनजीवन विस्कळीत झाल्याचंही मुळीक म्हणाले.

राज्य सरकार मुद्दाम पुण्यातील जनतेवर अन्याय करतंय याचं कारण फक्त पुणे महानगरपालिकेत भाजप सत्तेत आहे. व्यापारी लोकांचं झालेलं नुकसान या कारणाने लोकांमध्ये असंतोष होता. त्यांनी वेळोवेऴी निवेदन दिली. भाजपने केलेल्या आंदोलनाचा यावेळी फायदा झाला असंही ते म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या

“सगळं केंद्राने करावं आणि केंद्राने द्यावं, मी फक्त मर्सिडीज चालवणार”

“लोकल सुरु करण्याबाबत दानवेंशी चर्चा करण्याची गरज नाही”

“कुठपर्यंत शांत बसायचं, शेवटी काही मर्यादा असतात, राष्ट्रवादीला आम्ही कधीही बुडवू शकतो”

देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या आकड्यात घट कायम; वाचा आजची आकडेवारी

शिल्पा शेट्टीच्या अडचणीत वाढ; आता आणखी एका आरोपामुळे चर्चेत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More