नवी दिल्ली | बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि जेडीयूचे नेते जगन्नाथ मिश्रा यांचं आज दीर्घ आजाराने निधन झालं आहे. ते 82 वर्षांचे होते. दिल्लीतील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.
राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांचे बिहारच्या राजकारणात आगमन होण्यापूर्वी जगन्नाथ मिश्रा हे तीन वेळा बिहारचे मुख्यमंत्री राहिले होते. मिश्रा हे बिहारचे एक मोठे नेते होते, त्यांनी बराच काळ राजकीय क्षेत्रात घालवला.
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मिश्रा यांच्या निधनावर प्रतिक्रिया देताना शोक व्यक्त केला आहे. तसेच बिहार सरकारकडून राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
दरम्यान, माजी मुख्यमंत्री मिश्रा यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
Bihar former Chief Minister Jagannath Mishra has passed away in Delhi after prolonged illness. pic.twitter.com/zyDlVD4HBP
— ANI (@ANI) August 19, 2019
महत्वाच्या बातम्या-
–शिवसेनेच्या माजी मुख्यमंत्र्यांना ईडीची नोटीस; त्यावर त्यांचे सुपुत्र म्हणतात…
दोन राजेंचा संघर्ष राष्ट्रवादीच्या अंगाशी; उदयनराजेंमुळे रामराजेंचा राष्ट्रवादीला दे धक्का???
-अभिनेत्री रविना टंडनने उद्घाटन केलेल्या स्पामधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
-त्यावेळी शरद पवार वेडे झालेले मी पाहिले होते पण आता….- कविवर्य ना.धों. महानोर
-“पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन भारताचे नवीन हिटलर”
Comments are closed.