बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘हा योगायोग नाही’; राणा जगजितसिंह पाटलांचं मुख्यमंत्र्यांना दुसरं पत्र

मुंबई | मराठा आरक्षणप्रश्नी भाजप नेते आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दुसऱ्यांदा पत्र लिहिलं आहे. तुमचं सरकार मराठा आरक्षणप्रश्नी न्यायालयात बाजू मांडताना कमी पडलं, हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलंय, असं जगजितसिंह पाटील म्हणालेत.

महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं आणि मा. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केलं हा काही योगायोग नव्हता. कारण आपलं सरकार मराठा आरक्षणा संदर्भात बाजू मांडण्यात कमकुवत राहिलं आणि अपयशी झालं हे उभ्या महाराष्ट्रानं पाहिलं आहे, अशी टीका जगजितसिंह पाटील यांनी केली आहे.

न्यायालयीन लढ्या दरम्यान वकील आणि सरकार यांमध्ये समन्वयाचा अभाव, कोणतीही व्युव्हरचना नसणे यातून आपली मराठा आरक्षण देण्याची इच्छाशक्ती नव्हती हे सिद्ध झाले. यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे उमेदीचे वर्ष हातचे निसटले आणि अनेकजण नैराश्यात गेले आहेत, असं त्यांनी पत्रात म्हटलंय.

पुरोगामी महाराष्ट्रात नेहमी मोठ्या भावाची आणि समजूतदारपणाची भूमिका घेणाऱ्या मराठा समाजाचं हक्काचं आरक्षण आपण हिरावून घेतलं. यानंतर चुकीचे शासन निर्णय काढून तोंडाला पानं पुसली. आत्ता तर तुम्ही आमच्या आस्तित्वावरंच घाव घालताय. मराठा समाजाच्या संयमाचा अंत पाहू नका, असा इशारा त्यांनी दिला आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘डॉक्टर्स अन् नर्सेसला घर बांधण्यासाठी फुकट जागा देणार’; सरकारचा मोठा निर्णय

हीच ती वेळ, दिरंगाई झाल्यास दशकभरात मुंबईत राहणं मुश्किल होईल- आदित्य ठाकरे

अगोदरच गॅसदरवाढ, त्यात एजन्सी तुमच्याकडून सिलेंडरचे जास्त पैसे घेतीय? इथे तक्रार करा…

“मानवतेचा खून करण्याची शिकवण खरं तर कुठलाच धर्म देत नाही”

उद्धव ठाकरे-फडणवीसांमध्ये 20 मिनिटं चर्चा, गुजगोष्टी काय झाल्या, फडणवीसांनी दिली माहिती!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More