उस्मानाबाद | महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे की गुंडाराज?, असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. कारण आजारी साखर कारखाना विकत घेण्यासाठी लिलावात सहभाग घेतल्यामुळे जय हिंद साखर कारखान्याचे संचालक शालिवाहन माने-देशमुख यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. बब्रुवान माने देशमुख यांनी यासदंर्भात बेंबळी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
शालिवाहन माने-देशमुख पंजाब नॅशनल बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया यांच्या आग्रहास्तव उस्मानाबादच्या नितळी येथील जय लक्ष्मी शुगर हा कारखाना पाहण्यासाठी गेले होते. सदर कारखाना हा दोन्ही बँकांनी न्यायालयाच्या आदेशाने लिलावात काढला आहे. रितसर टेंडर भरून हा साखर कारखाना पाहण्यासाठी ते गेले होते, पण सदर ठिकाणी विजय दंडनाईक यांचा मुलगा रोहित दंडनाईक याने अचानक येऊन माने देशमुख यांच्या गाडीला स्वतःची गाडी आडवी लावली व आपल्या साथीदारांसह त्यांच्यावर प्राणघातक हल्ला चढवला, असं तक्रारीत म्हटलं आहे.
लिलाव झाल्यास जय लक्ष्मी शुगर कारखाना आपल्या हातातून जाईन, या भीतीपोटी रोहित दंडनाईक याने त्याच्या मित्रांसमवेत हा हल्ला केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. सुदैवाने कंटेन्मेंट झोनमध्ये बंदोबस्तासाठी पोलीस होते म्हणून आमचा जीव वाचला, असंही तक्रारीत म्हटलं आहे.
सदर घटनेची फिर्याद बेंबळी पोलीस ठाण्यात देऊनही तिथल्या पोलीस प्रशासनाने जाणून-बुजून या आरोपींना अभय देण्याचे काम करून जामीनपात्र गुन्हे दाखल केल्याचं माने-देशमुख यांनी म्हटलं आहे. दरम्यान, सद्यस्थितीत उस्मानाबादमध्ये साखर कारखाने बंद असल्याने जिल्ह्याचा ऊस लातूर तसेच सोलापूरला जात आहे, असे प्रकार सुरु राहिल्यास जिल्ह्यात कुणीही उद्योगधंदे सुरु करण्यास पुढे येणार नाही, अशी भावना व्यक्त केली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
न्याय मिळणारच हे आपलं सरकार आहे, आपल्या सरकारविरोधात मोर्चे काढू नका- उद्धव ठाकरे
‘काळजी करू नका…2-3 दिवसात बर्या व्हाल’; ९० वर्षांच्या आजीला जयंत पाटलांनी दिला धीर
“कायद्याचं राज्य आहे ना? की एका बबड्याच्या फायद्याचं?”
महाराष्ट्राच्या बदनामीचा डाव आखला जातोय- उद्धव ठाकरे
“सरकार चालवता येत नसेल तर उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा”
Comments are closed.