‘जय महाराष्ट्र’चा वाद पेटला, शिवसेना-स्वाभिमानी आक्रमक

Photo- IBN

कोल्हापूर | जय महाराष्ट्र बोलल्यास बेळगावात लोकप्रतिनिधींचं पद रद्द करणारा कायदा कर्नाटक सरकार करण्याच्या तयारीत आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेना आक्रमक झालीय. कोल्हापुरात कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या बसवर जय महाराष्ट्र लिहिलेले पोस्टर शिवसेनेकडून चिटकवण्यात आले.

दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनंही शाहू टोल नाक्याजवळ कर्नाटक राज्याच्या बस अडवून त्यावर जय महाराष्ट्र लिहिलेले पोस्टर चिटकवले. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या