नवी दिल्ली | लोकसभेत जय श्री रामच्या घोषणा देणं योग्य नाही, असं अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी म्हटलं आहे. त्या माध्यामांशी बोलत होत्या.
17 व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाला सोमवारी नवी दिल्लीमध्ये सुरूवात झाली. यावेळी पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी सर्व सदस्य खासदारकीची शपथ घेत असताना बाकांवरील सत्ताधारी सदस्यांकडून जय श्रीरामच्या घोषणा दिल्या गेल्या. यावरच नवनीत राणा यांनी आक्षेप घेतला आहे.
लोकसभेत धार्मिक घोषणा देणं योग्य नाही. घोषणा देण्याची ही जागा देखील नाही. त्यासाठी मंदिरे आहेत, असं नवनीत राणा यांनी म्हटलं होत.
दरम्यान, नवनीत राणा या पहिल्यांदाच निवडून लोकसभेत गेल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
-विधानसभेत एकनाथ खडसे आक्रमक; सरकारवर केली प्रश्नांची सरबत्ती
-केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने केला हत्येचा प्रयत्न; पोलिसांनी आवळल्या मुसक्या
-श्रेयवादाच्या लढाईवरून अजित पवारांनी शिवसेना-भाजपला काढले चिमटे
-ड्रायव्हिंग लायसन्स काढणं झालं सोपं; गडकरींनी केला ‘हा’ नियम शिथील
-माझा वाघ कुठे आहे?; शहीद जवानाच्या आईने फोडला हंबरडा
Comments are closed.