नवी दिल्ली | कालपासून लोकसभेत निवडून गेलेल्या नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी पार पडत आहे. आज हैद्राबादचे एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी शपथ घेण्यासाठी पुढे आले तेव्हा काही खासदारांनी ‘जय श्रीराम’, ‘भारतमाता की जय’ अशा घोषणा संसदेत दिल्या गेल्या.
ओवैसींनी या घोषणा ऐकल्या आणि आणखी जोरात घोषणा द्या असा इशारा आपल्या हातांनी संबंधित खासदारांना केला. यानंतर त्यांनी शपथ ग्रहण केली. शपथ संपताच ‘जय भीम’, ‘जय मीन तनवीर’, ‘अल्लाह हू अकबर’, ‘जय हिंद’ असा नारा दिला.
शपथ घेतल्यानंतर सही करायला ओवैसी विसरले. अधिकाऱ्याने आठवण करून दिल्यानंतर मात्र त्यांनी सही केली.
दरम्यान, ओवैसींच्या प्रत्युत्तराने घोषणा देणाऱ्या खासदारांना जोरदार चपराक बसल्याची भावना नेटकरी व्यक्त करत आहेत.
Today, I was welcomed with some slogans when I stood up to take my oath on the Constitution of India https://t.co/bQo1mTvjOK
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) June 18, 2019
Asaduddin Owaisi, AIMIM on ‘Jai Sri Ram’ & ‘Vande Mataram’ slogans being raised in Lok Sabha while he was taking oath as MP: It is good that they remember such things when they see me, I hope they will also remember the constitution and deaths of children in Muzaffarpur. pic.twitter.com/THJN8n8out
— ANI (@ANI) June 18, 2019
महत्वाच्या बातम्या
-अभिनेता संजय दत्तचा पहिला मराठी सिनेमा, पाहा टिझर
-मुनगंटीवार आणि केसरकरांच्या पेटाऱ्यात दडलंय काय?? आज राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर होणार
-मी पाक क्रिकेट संघाची आई नाही; सानिया आणि वीणा मलिकची ट्वीटरवर जुंपली
-पुणेकरांसाठी खुशखबर; हेल्मेटसक्तीची कारवाई थांबवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
-जुन्या विनोदाने शिक्षणाची घाण केली; बच्चू कडूंचा तावडेंवर हल्लाबोल
Comments are closed.