बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘त्या’ अँथममधून जयदीप राणाचं नाव वगळलं; नवाब मलिकांचा दावा

मुंबई | राष्ट्रावादीचे नेते राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक मागील काही दिवसांपासून आक्रमक भूमिका घेत आहे. त्यांनी कथित क्रूझ ड्रग्स प्रकरणामध्ये आरोपांची खैरात करताना दिसत आहेत. जयदीप राणा आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत चांगले संबंध असून आणि जयदीप राणा हा ड्रग्स पेडलर आहे, असा आरोप मलिक यांनी फडणवीस यांच्यावर केला आहे.

नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांवरून भाजपमध्ये एकच खळबळ उडाल्याचं पहायला मिळत आहे. मलिक यांनी केलेले आरोप फडणवीस यांनी नाकारले आहेत. पण त्यातच आता जयदीप राणा ज्या मुंबई रिव्हर गाण्याचा फायनान्स हेड आहे त्या गाण्याच्या अँथममधून त्याचं नाव वगळण्यात आलं असल्याचं आता समोर आलं आहे. त्यामुळं मलिकांना केलेल्या आरोपांना अधिक महत्व प्राप्त होताना दिसत आहे.

नवाब मलिक यांनी सोमवारी सकाळी पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर मोठा आरोप केला होता. जयदीप राणाचा फोटो मलिक यांनी ट्विट केला आहे. जयदीप राणा हा सध्या तुरूंगात आहे. तो दिल्लीच्या 2020 मधील एका प्रकरणामध्ये तुरूंगात आहे. त्याला ड्रग्सच्या ट्रॅफिकिंग संदर्भात अटक करण्यात आलेली आहे.

दरम्यान, मुंबई रिव्हर अँथम हे फडणवीस मुख्यमंत्री असताना करण्यात आलं होतं. तेव्हा देखील या गाण्यामुळं फडणवीस पती पत्नी ट्रोल झालेले पहायला मिळालं होतं.

पाहा ट्विट –

थोडक्यात बातम्या –

”तो’ लपून बसला नाही, तो सध्या…’; प्रभाकर साईलच्या वकिलांचा मोठा खुलासा

अभिनेत्री दिव्या भारती यांच्या वडिलांचे निधन; साजिद नाडियाडवालाने दिली अखेरपर्यंत साथ

‘शेतकऱ्यांची काळी दिवाळी करणार असाल तर…’; सदाभाऊ खोतांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

‘सिर्फ घर नहीं, यहां तो पुरी सरकारही…’; गोपीचंद पडळकरांचा खोचक टोला

‘भारतात कधी मुस्लीम व्होट बँक नव्हतीच, फक्त…’; असदुद्दीन औवेसींचं खळबळजनक वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More