बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आम्हाला जेल नवी नाही, बॅचलर ऑफ जेल म्हणजे शिवसेना”

मुंबई | मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये चांगलीच खडाजंगी पहायला मिळत आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सर्व पक्षांचे नेते जोरदार तयारीला लागल्याचं दिसून येतंय, अशातच आता आजच्या गुलाबराव पाटील यांनी सांगोल्यात आमदार शहाजीराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त चांगलीच शाब्दिक फटकेबाजी केली. त्याेळी त्यांनी विरोधकांवर टोले लगावत शिवसैनिकांचं कौतुक देखील केलं आहे.

बॅचलर ऑफ जेल म्हणजे शिवसेना आहे. एवढं लक्षात ठेवा बोकडाचं मरण ही परमेश्वराची इच्छा असते, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं. त्याचबरोबर आमचं मरण आता परमेश्वर ठरणार आहे का?, असा सवाल देखील गुलाबराव पाटलांनी यावेळी विचारला आहे.

चंद्रकांत पाटील शेतकऱ्यांविषयी बोलतात. पण त्यांना गन्ना म्हणजे काय माहितीये का?, असा खोचक सवाल देखील गुलाबराव पाटलांनी चंद्रकांत पाटलांना यावेळी विचारला आहे. शरद पवारांनी सरकार चालवण्याची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे ड्रायव्हर आहे. अजितदादा कंडक्टर आणि बाळासाहेब थोरात प्रवासी आहेत, असंही गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले.

दरम्यान, यंदाचा दसरा मेळावा मुंबई सायनच्या षण्मुखानंद सभागृहात पार पडणार आहे. 50 टक्क्यांच्या उपस्थित हा दसरा मेळावा पार पडणार आहे. यंदाच्या दसरा मेळाव्याला सगळे वरिष्ठ नेते देखील उपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे आता सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“महाराष्ट्राच्या घोटाळेबाज सरकारच्या घोटाळ्यांच्या पुतळ्याचं आज दहन करणार”

ट्विटरवर होतोय ‘आज का रावण नरेंद्र मोदी’ हा हॅशटॅग ट्रेंड’; तब्बल एवढ्या लोकांनी केलंय ट्विट

“आमचे राज्यात 22 खासदार होणार, 2024 मध्ये शिवसेना देशाच्या राजकारणात केंद्रस्थानी असेल”

मोठी बातमी! सिंघू सीमेवर तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

“लायसन्स नसूनही उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी थेट व्होल्वो बस चालवायला दिली”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More