Rajasthan Couple Video | राजस्थानमधील जयपूर शहरात एक धक्कादायक घटना घडली असून, एका पंचतारांकित हॉटेलमधील खोलीत रोमान्स करणार्या जोडप्याचा व्हिडिओ रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी शूट करून सोशल मीडियावर पोस्ट केल्याने खळबळ उडाली आहे. प्रणयात तल्लीन झालेले हे जोडपे खिडकीतील पडदा टाकायला विसरले, ज्यामुळे त्यांचा खासगी प्रसंग लोकांच्या कॅमेरात कैद झाला आणि त्यानंतर तो प्रचंड व्हायरल झाला.
कपलचा व्हिडीओ व्हायरल
ही घटना मंगळवारी रात्री साधारणतः १० वाजताची आहे. जयपूरमधील (Rajasthan Couple Video) सिव्हिल लाईन परिसरात असलेल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हा प्रकार घडला. भारत जोडो पुलावरून नेहमीप्रमाणे वाहनांची वर्दळ सुरू होती.
रस्त्यावरून जाणाऱ्या काही लोकांची नजर हॉटेलच्या खिडकीवर पडली. त्यांना जे दिसले, ते पाहून ते अवाक् झाले, कारण हॉटेलमध्ये रोमान्स करत असलेल्या जोडप्याने खिडकी पडद्याने झाकलीच नव्हती.
लोकांकडून व्हिडीओ शूट
यामुळे, त्यांचा रोमान्स रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांना स्पष्टपणे दिसला. त्यानंतर रस्त्यावर लोकांची गर्दी जमायला सुरुवात झाली. लोकांनी खिशातील आणि हातातील मोबाईल काढून लगेच व्हिडिओ शूट करायला सुरुवात केली.
या प्रकारामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडीही झाली होती. या जोडप्याच्या प्रणयाचा संपूर्ण व्हिडिओ शूट करून तो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला, जिथे तो प्रचंड व्हायरल झाला.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हॉटेलच्या व्यवस्थापनाकडे याबद्दल माहिती घेण्यात आली. मात्र, त्यांनी दिलेले उत्तर बुचकळ्यात पाडणारे होते. ज्या खोलीत हे जोडपे रोमान्स करताना दिसत होते, ती खोली हॉटेलची नसल्याचे व्यवस्थापनाने सांगितले. परंतु, तोपर्यंत हॉटेलच्या नावासह हा व्हिडिओ सगळीकडे पसरला होता, ज्यामुळे हॉटेलच्या प्रतिमेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
News Title- Rajasthan Couple Video Viral
जयपुर में 22 गोदाम के पास स्थित होटल में एक
कपल योग करता हुआ 🥴 pic.twitter.com/UZwV5c8jr4— Dalip Gurjar (@Dalipsingh0018) June 19, 2025