Top News विदेश

ब्राझीलच्या राष्ट्रपतींना आठवली संजीवनी; हनुमानाचा फोटो शेअर करत मानले मोदींचे आभार

ब्राझील | कोरोनाने जगात हैदोस घातला होता मात्र आता लसीमुळे कोरोनावर आपण मात करणार असल्याचा विश्वास सर्वांना आला आहे. भारतात लसीकरणाला सुरूवात झाली आहे. या लसीसाठी ब्राझीलने भारताकडे मदतीता हात पुढे केला होता. भारतानेही लस त्यांना दिली आहे. ही लस ब्राझीलमध्ये पोहोचली आहे. याच पार्श्वभूमीवर ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी भारताचे आभार व्यक्त करताना हनुमानाचं छायाचित्र ट्विट केलं आहे.

जागतिक संकटाला दूर करण्यासाठीच्या प्रयत्नांमध्ये सहभागी असलेला एक सहकारी भेटल्याबद्दल ब्राझीलला अभिमान वाटत आहे. भारतातून ब्राझीलला लसीचा पुरवठा करून सहकार्य केल्याबद्दल आभार, असं ब्राझीलचे राष्ट्रपती जैर एम बोलसोनारो यांनी म्हटलं आहे.

ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी हनुमानाचा फोटो ट्विट केला आहे. रामायणामध्ये हनुमान आपल्या करंगळीवर संजीवनी आणत असल्याचा फोटा आहे. जैर एम बोलसोनारो यांनी कोरोना लसीला संजीवनीची उपमा दिली आहे. पंतप्रधान मोदींनीही त्यांच्या ट्विटला प्रतिसाद दिला आहे.

बोलसोनारोजी, कोविड महामारीविरुद्ध एकजुटीने लढण्यासाठी ब्राझीलचा विश्वासू सहकारी होणं हा आमचा सन्मान आहे. आरोग्यसेवांवरील आपलं सहकार्य भारत बळकट करत राहिलं, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

 

थोडक्यात बातम्या-

खळबळजनक! चार शेतकरी नेत्यांची गोळ्या घालून हत्या करण्याचा कट; शुटरची जाहीर कबुली

क्रिकेटमध्ये सेक्स स्कँडल?; 20 वर्षीय क्रिकेटपटूला रंगेहाथ पकडल्यानं खळबळ

“झाडाचं पान का पडलं म्हणूनही भाजप आंदोलन करू शकतं त्यामुळे आम्ही फारसं लक्ष देत नाही”

शाळा सुरु होण्याची तारिख बदलली; आता ‘या’ तारखेला भरणार वर्ग!

“…तर पवार साहेब ‘सीरम’मध्ये वशिला लावतील”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या