बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक अपघात, …अन् कार थेट विहिरीत कोसळली!

जालना | जालन्याहून बुलडाण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर भीषण अपघात झाला आहे. मारुती सुझुकी ब्रीजा (एमएच २२, एएम २७०१) ही गाडी विहिरीत कोसळली आहे. चालकाचा ताबा सुटल्यामुळे हा प्रकार घडला असल्याचं सांगण्यात येत आहे.

जामवाडी शिवारातील युवराज धाब्यासमोर हा धक्कादायक प्रकार घडला. सायंकाळी ६.३० ते पावणे सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या अपघातात दोन जण ठार झाले असून एका मृतदेहाच्या खिशातील आधार कार्डवरुन त्याची ओळख पटली आहे.

अब्दुल मन्नान शेख सगीर (रा. बीड) असं मृत व्यक्तीचं नाव असून बीडमधील सागर फॅब्रीकेशन या प्रसिद्ध दुकानाचे ते मालक होते, अशी माहिती समोर आली आहे. दुसऱ्या मयताचे नाव अझहर कुरैशी असं आहे.

दरम्यान, काठोकाठ भरलेल्या विहिरीत ही गाडी पडल्यामुळे जालना पोलिसांना बचावात अडथळे निर्माण झाले होते, यासंदर्भात रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरु होतं, अशी माहिती पोलीस निरीक्षक यशवंत बागुल यांनी दिली आहे.

थोडक्यात बातम्या-

Shree

‘पोलिसांनी पूजा चव्हाणची ती गोष्ट तपासावी, बऱ्याच गोष्टी बाहेर येतील’; भाजपच्या नेत्याच्या गौप्यस्फोट

…ही बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेसाठी लाजिरवाणी गोष्ट- चंद्रकांत पाटील

पुन्हा लॉकडाऊनबाबत राजेश टोपे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी तृप्ती देसाई आक्रमक, सरकारवर केला ‘हा’ गंभीर आरोप

“होळकरांच्या सामाजिक कार्याचा उपयोग करून राजकीय स्वार्थ साधण्याचा शरद पवारांचा प्रयत्न”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More