राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर तलवारीने वार; भाजप आमदाराच्या भाच्याला अटक

जालना | राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर तलवारीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना जालन्यात घडली आहे. याप्रकरणी बदनापूरचे भाजप आमदार नारायण कुचे यांच्या भाच्याला अटक करण्यात आली आहे. 

भीमराव डिघे असं जखमी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचं नाव आहे. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

नारायण कुचे यांच्या सांगण्यावरुन त्यांच्या भाच्याने हा हल्ला केल्याचा आरोप करण्यात येतोय. त्यामुळे भाजप आमदार अडचणीत सापडण्याची चिन्हं आहेत. 

भीमराव राष्ट्रवादीच्या सोशल मीडियाचं काम पाहतात. डिघे कुचेंविरोधात टाकत असलेल्या पोस्ट कुचे यांना खटकत होत्या. याप्रकरणी कुचे यांनी धमकी दिली होती, असा आरोप देखील डिघे यांनी केला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-नागपुरचं आर्थिक गणित सुधारण्यासाठी तुकाराम मुंढेंना आणा- विजय वडेट्टीवार

-भाजपला राष्ट्रीय आप्पती समजून सत्तेतून हद्दपार करू- शरद पवार

-जिल्ह्याच्या विकासाच्या आड येणाऱ्या सर्व पक्षांना उद्ध्वस्त करू!

-संघावर बंदी आणणं नेहरुंना जमलं नाही, राहुल गांधींनाही जमणार नाही!

-महाराष्ट्र औद्योगिक विकासात मागे का?; शिवसेनेचा सरकारला सवाल