पुण्यासारखंच जळगावमध्ये मर्सिडीजनं चौघांना चिरडलं, राजकारण्याचा मुलगा मोकाट?

Jalgaon Accident | पुण्यात कल्याणीनगर भागात झालेल्या अपघाताने संपूर्ण देश हादरला. एका मोठ्या बिल्डरच्या अल्पवयीन तरुणानं पोर्शे कार भरधाव चालवत दुचाकीवर असलेल्या तरुण, तरुणीला चिरडलं. विशेष म्हणजे या घटनेनंतर आरोपीला तातडीनं जामीन देखील मिळाला होता. मात्र या अपघातानंतर सामान्य जनतेमध्ये संतप्त पडसाद उमटले.

पुण्यासारखंच जळगावमध्ये घडलं

पुणे पोलिसांच्या (Pune Police) कारवाईवरही अनेकांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. पोलिसांनी (Pune Police) चुकीचा तपास केला, पैशांची सेटलमेंट केली असा आरोप विरोधकांकडून करण्यात आला त्यानंतर हे प्रकरण चांगलं तापलं. हे प्रकरण ताजं असतानाच जळगावमध्ये (Jalgaon Accident) देखील अशीच घटना घडल्याचा प्रकार समोर आला आहे.

जळगावातील (Jalgaon Accident) रामदेव वाडी जवळ 17 दिवसांपूर्वी अपघात झाला होता. या अपघातात चार जणांचा दुर्दैवी मृत्यू देखील झाला, मात्र असं असतानाही या अपघातातील आरोपींना पोलिसांनी अटक केली नसल्याची माहिती समोर आलीये.

Jalgaon Accident | आरोपी अद्यापही मोकाटच

जळगावच्या शिरसोली रोडवरील रामदेव वाडी येथे 17 दिवसांपूर्वी एक भीषण अपघात झाला होता. एक महिला आपली दोन मुलं आणि भाच्याला घेऊन दुचाकीवरून जात असताना एका सुसाट कारने दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी रामदेव वाडी गावातील जमावाने अपघातग्रस्त कारमधील दोघांना बाहेर काढले. कारमधील या दोघांनीही नशा केल्याचं दिसून आलं.

मुंबईत उपचार घेत असल्याचं कारण देत आरोपी अद्यापही मोकाटच आहेत. तसेच या अपघातग्रस्त कारमध्ये गांजाच्या पुड्या आढळल्या आहेत. यातील दोघा संशयीतांचे ब्लड सॅम्पल 17 दिवस उलटूनही पोलिसांना अद्याप मिळाले नाही.

वेदांत अग्रवालप्रमाणे या अपघातातील आरोपी जळगावातील मोठ्या बिल्डरचा आणि नेत्याचा मुलगा असल्याने पोलीस गप्प बसले का?, अशी चर्चा जळगावात आता रंगत आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“लग्नापूर्वी वर्षभर..”, आमिर खानच्या एक्स पत्नीचा धक्कादायक खुलासा

पुणे अपघातप्रकरणी विशाल अग्रवालची धक्कादायक कबुली!

ऐश्वर्याच्या एक्स बॉयफ्रेंडचा अभिषेक बच्चनबाबत मोठा खुलासा!

“तरूण पिढी नारळ पाणी पिण्यासाठी जाते का?”, वसंत मोरे संतापले

दिनेश कार्तिकच्या पहिल्या बायकोने केले ‘या’ क्रिकेटरसोबत लग्न! जाणून घ्या इन साईड आणि आऊट साईड स्टोरी