जळगाव हादरलं! प्रेमविवाहाचा रक्तरंजित शेवट; पाच वर्षांनंतर उगवला सूड

Jalgaon Crime  Love marriage turns into a brutal murder in Jalgaon after 5 years

Jalgaon Crime | महाराष्ट्रात (Maharashtra) गुन्हेगारीच्या (Crime) घटनांमध्ये वाढ होत असून, दिवसाढवळ्या (Broad Daylight) हत्या (Murders), खून (Murders), लैंगिक अत्याचार (Sexual Assault), किरकोळ कारणातून कोयता (Koyta), तलवारीने (Sword) मारहाण (Assault), गुंडगिरी (Hooliganism) अशी कित्येक प्रकरणे (Cases) दररोज समोर येत आहेत. (Jalgaon Crime)

जळगावात (Jalgaon) पाच वर्षांपूर्वी केलेल्या प्रेमविवाहाचा राग मनात ठेवून सासरच्या मंडळींनी (In-laws) कोयता आणि चॉपरने (Chopper) वार करत जावयाची हत्या केल्याची भयंकर घटना घडली आहे. या हल्ल्यात जावयाचा मृत्यू झाला असून, त्याला वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या त्याच्या कुटुंबातील ७ जण गंभीर जखमी (Seriously Injured) झाले आहेत.

प्रेमविवाहाला विरोध आणि पाच वर्षांनंतर सूड

जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको (Pimprala Hudco) परिसरात राहणाऱ्या मुकेश रमेश शिरसाठ (Mukesh Ramesh Shirsath) याने पाच वर्षांपूर्वी पूजा (Puja) नामक तरुणीशी पळून जाऊन प्रेमविवाह केला होता. तेव्हापासून शिरसाठ कुटुंबीय आणि तरुणीच्या माहेरील मंडळींमध्ये वाद सुरू होते. रविवारी (Sunday) सकाळी मुकेश दुकानावर (Shop) जाण्यासाठी घराबाहेर आला असता, मुलीच्या माहेरच्या मंडळींनी त्याच्यावर कोयता आणि चॉपरने हल्ला केला.  या हल्ल्यात मुकेशचा जागीच मृत्यू झाला. (Jalgaon Crime)

मुकेशवर वार होत असताना त्याला वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या मुकेशचा भाऊ, काका, काकू, दोन चुलत भाऊ, चुलत बहीण यांच्यावरही मुलीच्या माहेरच्यांनी वार केले. या हल्ल्यात कुटुंबातील ७ जण जखमी झाले आहेत.

सैराटची पुनरावृत्ती; परिसरात तणाव

या घटनेमुळे जळगावात ‘सैराट’ चित्रपटाची पुनरावृत्ती झाल्याची चर्चा असून, प्रेमविवाहातून झालेल्या या हत्याकांडामुळे (Massacre) संपूर्ण शहर सुन्न झाले आहे. परिसरात तणावाचे वातावरण (Tense Atmosphere) असून, मोठा पोलीस बंदोबस्त (Police Security) लावण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच जळगाव पोलीस (Jalgaon Police) घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात (Ramandnagar Police Station) तरुणीच्या भावासह (Brother) सात जणांविरोधात (Against Seven People) गुन्हा दाखल (FIR) केला असून, यातील सहा जणांना अटक (Arrest) करण्यात आली आहे.

आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी

डोळ्यांदेखत झालेल्या मुकेशच्या हत्येनंतर रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी झाली होती. या घटनेने संपूर्ण गाव हादरले आहे. मुकेशच्या कुटुंबीयांनी (Family Members) आरोपींना कठोर शिक्षा (Strict Punishment) करण्याची मागणी केली आहे. “प्रेमविवाह केल्याने मुलीच्या घरच्यांचे आपल्या पुतण्यासोबत वैर (Enmity) निर्माण झाले होते. विवाह झाल्यापासून ते त्याचा बदला घेण्यासाठी संधीची वाट पाहत होते. रविवारी त्यांना मुकेश एकटा सापडला. लाठी, काठी, कोयता, चॉपर मिळेल त्या शस्त्राने वार करत मुलीच्या कुटुंबीयांनी मुकेशला ठार केले,” असे मृत मुकेशचे काका निळकंठ शिरसाठ (Nilkanth Shirsath) यांनी म्हटले आहे. (Jalgaon Crime)

Title : Jalgaon Crime  Love marriage turns into a brutal murder in Jalgaon after 5 years

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .