सहा वर्षीय बालिकेला अत्याचार करुन संपवलं, संतप्त जमावानी केलं धक्कादायक कृत्य

Crime News l राज्यात गेल्या कित्येक दिवसांपासून क्राईम गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. अशातच आता जळगाव जिल्ह्यातील जामनेरमध्ये येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एका नराधम आरोपीने सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केली आहे. या घटनेमुळे राज्यभर खळबळ उडाली आहे.

जामनेरमध्ये घडली धक्कादायक घटना :

जामनेर येथे सहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीला अटक केल्याची माहिती कळताच शेकडोच्या संख्येने जमावाने पोलीस स्टेशनवर मोर्चा काढत आरोपीला ताब्यात देण्याची मागणी केली होती. मात्र, पोलिसांनी आरोपीला सुरक्षित ठिकाणी हलवल्याचे कळताच जमावामध्ये शांततेचे वातावरण पसरले.

याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यावर देखील तुफान दगडफेक करण्यात आली आहे. या धक्कादायक घटनेत मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले आहेत. जामनेरमध्ये दगड आणि जाळपोळ झाल्याच्या धक्कादायक घटनेनंतर जखमी पोलिसांना जळगाव मधील खासगी आणि जिल्हा रुग्णालयात दाखल देखील करण्यात आले आहे. यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी खासगी आणि जिल्हा रुग्णालय जाऊन जखमी पोलीस कर्मचाऱ्यांशी विचारपूस केली.

Crime News l जळगाव पोलिस उचलणार मोठं पाऊल :

चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या करण्यात आलेल्या आरोपीला अटक केल्यानंतर ही काही समाजकंटकांनी कायदा हातात घेत पोलिसांवर दगडफेक केली आहे. याप्रकरणात पोलीस स्टेशन येथील सीसीटीव्ही फुटेज तपासून या सर्व लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

तसेच त्यांच्यावर आता कायदेशीर कारवाई देखील करण्यात येणार आहे. या घटनेसाठी जबाबदार असलेल्या जमावातील कोणालाही सोडले जाणार नाही, अशी ठाम भूमिका पोलिसांनी घेतल्याची माहिती जळगावचे अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी दिली आहे.

News Title – Jalgaon Jamner Crime News 

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर

या दोन राशीच्या व्यक्तींना सौभाग्य लाभणार

सलमान खान गोळीबार प्रकरणी मोठी माहिती समोर!

“काहीही करा पण…”; शरद पवारांची शेतकऱ्यांना कळकळीची विनंती

TMKOC च्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी समोर!