अंत्ययात्रेत घडला धक्कादायक प्रकार, नातेवाईक पळत सुटले, काय घडलं?

Jalgaon News Honeybee Attack on Funeral Procession in Parola 

Jalgaon News | जळगावच्या (Jalgaon News) पारोळा (Parola) तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नगाव (Nagaon) गावात अंत्ययात्रेदरम्यान नातेवाईकांची धावपळ उडाली आणि ते मृतदेह रस्त्यात सोडून पळत सुटले.

अंत्ययात्रेत मधमाशांचा हल्ला

पारोळा (Parola) तालुक्यातील नगाव (Nagaon) गावात स्मशानभूमीकडे जाणाऱ्या अंत्ययात्रेत सहभागी नागरिकांवर अचानक मधमाशांनी हल्ला केला. मधमाशांच्या हल्ल्यामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली. या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

नेमके काय घडले

जळगावच्या (Jalgaon) पारोळा (Parola) तालुक्यातील नगाव (Nagaon) गावात ही घटना घडली. स्मशानभूमीकडे जाणाऱ्या अंत्ययात्रेत सहभागी नागरिकांवर अचानक मधमाशांनी हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे नातेवाईकांची एकच धावपळ उडाली. मृतदेह रस्त्यातच सोडून नातेवाईक मिळेल त्या दिशेने पळत सुटले. या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले.

स्वतःचा बचाव करण्यासाठी धावाधाव

मधमाशांनी हल्ला केल्यानंतर, स्वतःचा बचाव करण्यासाठी अंत्ययात्रेत सहभागी झालेले शोकाकुल नातेवाईक मृतदेह सोडून पळाले. नगाव (Nagaon) गावातील स्मशानभूमीकडे अंत्ययात्रा जात असताना रस्त्यात अचानक मधमाशांचे पोळे उठले आणि त्यांनी हल्ला केला. मधमाशांचा हल्ला झाल्याने नागरिकांमध्ये गोंधळ उडाला आणि घटनास्थळी धावपळ झाली. (Jalgaon News)

तीन जण गंभीर जखमी

मधमाशांच्या हल्ल्यात तीन जण गंभीर जखमी झाले, तर काही जण किरकोळ जखमी झाले. गंभीर जखमी झालेल्या तिघांना उपचारासाठी पारोळा (Parola) येथील कुटीर रुग्णालयात (Cottage Hospital) दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. साधु भागा भिल (Sadhu Bhaga Bhil) (वय 75), ओंकार शंकर भिल (Onkar Shankar Bhil) (वय 65), मधुकर सजन भिल (Madhukar Sajan Bhil) (वय 55, सर्व राहणार नगाव, ता. पारोळा) अशी या घटनेत गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. (Jalgaon News)

Title : Jalgaon News Honeybee Attack on Funeral Procession in Parola 

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .