पाणीपुरी खाणं पडलं महागात, जळगावातील 80 जणांना विषबाधा

Jalgaon News | पाणीपुरी ज्याला आवडत नाही असं कोणीच नसेल. मात्र आता पाणीपुरी खाणं हे जळगावातील तब्बल 80 जणांना महागात पडलं आहे. जळगावातील (Jalgaon News) चोपडे तालुक्यातील पिंप्री, चांदसणी कमळगाव गावातील नागरिकांनी पाणीपुरीचा स्वाद घेतला. मात्र ते त्यांच्या अंगलट आलं त्यामुळे त्यातील 80 जाणांना विषबाधा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. (Jalgaon News)

याचा विपरित परिणाम नागरिकांवर झाला आहे. उलट्या, जुलाब आणि पोटदुखीसारखा त्रास त्यांना जाणवू लागला आहे. त्यांच्यावर नजीकच्या अनेक रूग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू झाले होते. सध्या सर्वांची प्रकृती ही स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. (Jalgaon News)

80 रूग्ण खासगी रूग्णालयात दाखल

मिळालेल्या माहितीनुसार चोपडा गावात आठवडी बाजार सुरू होता. त्यावेळी नागरिक पाणीपुरीवर ताव मारत होती. तेव्हा आजूबाजूच्या गावातील नागरिक आठवडी बाजार खरेदी करण्यासाठी आले होते. पाणीपुरीचा आस्वाद घेतलेल्या अनेकांना मंगळवारी उलट्या, जुलाब आणि पोट दुखण्याचा त्रास झाला असून त्यांना आतापासून जवळपास 80 रूग्णांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यामध्ये लहानग्यांची सर्वाधिक संख्या आहे.

त्यानंतर 70 पैकी 30 रूग्णांना चोपडा येथे उपजिल्हा रूग्णालयात तसेच इतर रूग्ण खासगी व जळगाव जिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आलं. रात्री सुमारे 10 रूग्णांवर अडावद येते उपचार पाणीपुरीमुळे त्रास झाल्याबाबत सोमनाथ जगन कोळी राहणार पिंप्री यांनी पोलीस स्टेशनला लेखी जबाब दिला आहे. (Jalgaon News)

शिवसेना आमदार लता सोनवणेंची मदतीसाठी धाव

या घटनेची दखल ही शिवसेना आमदार लता सोनवणेंनी घेतली. त्यांनी तातडीने पोलीस स्टेशन गाठलं. त्यांनी रूग्णांची विचारपूस केली. तसेच घडलेल्या घटनेची माहिती जाणून घेत रूग्णालयातील वैद्यकीय आणि कर्मचाऱ्यांना योग्य त्या कर्मचाऱ्यांना उपचार देण्याची सूचना करण्यात आली आहे.

News Title – Jalgaon News Paani Puri Food Poisoning

महत्त्वाच्या बातम्या

सोनाक्षी-झहीरचे प्री-वेडिंग फंक्शन्स सुरू! ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात

छगन भुजबळ अजितदादांना धोका देऊन शरद पवार गटात जाणार का? भुजबळांनी दिल रोखठोक उत्तर

येत्या काही तासांत ‘या’ जिल्ह्यांत दमदार पावसाचा इशारा; कुठे बरसणार मुसळधार पाऊस?

आज या राशीचे व्यक्ती मोठा निर्णय घेतील! पण कोणासाठी?

‘संघर्षयोद्धा’ सिनेमात छगन भुजबळ-गुणरत्न सदावर्तेंची भूमिका कुणी साकारली?