दर्दी पोलीस ज्याला कोणी घाबरत नाही, नुसती दाद देतात!

जळगाव | जळगावमधील पोलिस संघपाल तायडे यांच्या आवाजनं नेटीझन्सला भुरळ पाडलीय. त्यांच्या गाणांच्या पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतायेत.

कोणत्याही संगीताची साथ नसताना संघपाल अतिशय दर्जेदार आणि श्रवणीय गाणं गातात. खाकीमागच्या या सृजनशीलतेची दखल घेणं खरच आवश्यक आहे.

संघपाल तायडे यांचं गाण पोलिस दलातील अनेकांमधील कलेच्या सूप्त इच्छा जागवणारं आहे. त्याचबरोबर खाकीमध्ये दडलेल्या अनेक कलाकारांना प्रेरणा देणारही आहे.