पावरा सर पाहिजे, शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन

जळगाव | शिक्षकांची बदली रद्द करावी या मागणीसाठी जळगावच्या कळमसरेतील माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांनी चक्क आंदोलन करण्यास सुरुवात केलीय.

धक्कादायक बाब म्हणजे या आंदोलनादरम्यान चक्कर येऊन पडल्याने काही विद्यार्थिनींना अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

संस्थाचालकांनी शिक्षक एस. एफ. पावरा यांनी संस्थेअंतर्गत बदली केलीय. त्यामुळे विद्यार्थ्यांनी हे आंदोलन पुकारलंय. दरम्यान, विद्यार्थ्यांसोबत पालकही या आंदोलनात सहभागी झालेत.