बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुस्लीम आरक्षणावरून इम्तियाज जलील-नवाब मलिक आमने सामने

मुंबई | राज्य विधीमंडळाचं अधिवेशन मुंबईमध्ये सुरू झालं आहे. अधिेवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सरकार आणि विरोधक यांच्यात विविध मुद्द्यांवरून जोरदार संघर्ष झाला आहे. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, मुस्लीम आरक्षण यावरून अधिवेशनात सरकारला विरोधकांनी घेरलं होतं. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मुस्लीम आरक्षणावरील प्रश्नावर अधिेवेशनात उत्तर दिली आहेत.

सपाचे आमदार अबु आझमी यांनी मुस्लीम आरक्षणाचा प्रश्न उपस्थित केला. यावर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सभागृहात उत्तर दिलं. सरकारनं आरक्षणाचा निर्णय घेतला तरी तो पुढं जाणार नाही, अशी खंत मुस्लीम आरक्षणावर मलिक यांनी व्यक्त केली आहे. मलिक यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील विरोधी पक्षांनी त्यांच्यावर जोरदार टीका करायला सुरूवात केली आहे.

नवाब मलिक यांनी विधानसभेत दिलेली माहिती म्हणजे मुस्लिमांना उल्लू बनवण्याचं काम आहे, अशी टीका एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. मलिक म्हणत आहेत आम्ही नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याचा विचार करत आहोत. पण आम्हाला शिक्षणात आरक्षण हवं आहे ते उच्च न्यायालयानं द्या असं सांगितलं आहे, असंही जलील म्हणाले आहेत.

दरम्यान, मुस्लीम आरक्षणासाठी काही दिवसांपूर्वीच एमआयएमनं मुंबईमध्ये तिरंगा यात्रा काढण्याची तयारी केली होती. ठाकरे सरकारनं मुंबईत न येऊ दिल्यानं तणाव निर्माण झाला होता. आता पुन्हा हा मुस्लीम आरक्षणावरून वाद रंगण्याची चिन्ह आहेत.

थोडक्यात बातम्या 

कुसुमाग्रजांची कविता, बाळासाहेबांची आठवण अन् फडणवीसांनी लगावला मुख्यमंत्र्यांना टोला

“…तर काय मजा येईल ना, मुख्यमंत्री आपण राज्यभर दौरे कराल का?”

मोठी बातमी! ओमिक्राॅनच्या पार्श्वभूमीवर ‘या’ राज्यात नाईट कर्फ्यू लागू

‘…अन्यथा आम्ही जशास तसं उत्तर देऊ’; एकनाथ शिंदे यांचा भाजपला निर्वाणीचा इशारा

“खाली बसा… मी मंत्र्याशी बोलतोय तुम्ही काय मंत्री आहे का?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More