Heat Stroke ते अ‍ॅसिडिटीपासून ‘या’ समस्यांवर लाभदायक आहे जलजीरा; जाणून घ्या रेसिपी

Jaljira Recipe | देशासह राज्यात देखील तापमानात प्रचंड वाढ झाल्याचं दिसतंय. अशात शरीराला थंड ठेवणं अत्यंत गरजेचं असतं. अन्यथा उष्माघात तसंच इतर समस्या उद्भवू शकतात. उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी काही खास गोष्टींचा आहारात समावेश करणं खूप गरजेचं असतं. अनेकदा या दिवसात भूक कमी आणि तहान जास्त लागते.

त्यामुळे या काळात तुम्ही मसालेदार आणि अत्यंत लाभदायक जलजीरा घरीच बनवून त्याचं सेवन करू शकता.यामुळे तुम्हाला उन्हापासून दिलासा तर मिळेलच शिवाय गॅस, अ‍ॅसिडिटीपासूनही तुम्हाला आराम मिळेल.यामुळे तुमच्या शरीराचे पीएच देखील संतुलित राहण्यास मदत होते.

जलजीरा बनवण्याची पद्धत

सामग्री : जलजीरा बनवण्यासाठी तुम्हाला (Jaljira Recipe) पुदिनाची 1/2  वाटी पत्ते, हिरवी आणि फ्रेश कोथिंबीर 1/4 वाटी, बूंदी- 1 वाटी, 4 ते 5 बर्फाचे तुकडे किंवा क्यूब्स लागतील.

इतर मसाले : आले 1 चमचा,चिंच पेस्ट 1 चमचा, काळी मिरची पावडर 1/4 चमचा, जीरा पावडर 1/2 चमचा, सौफ पावडर- 1/2 चमचा, आमचूर पावडर- 1 चमचा, हिंग एक चिमूट, साखर 1 चमचा किंवा आवश्यकतेनुसार, मीठ 1/2 चमचा, लिंबू रस 1 चमचा

जलजीरा बनवण्यासाठी सर्वप्रथम पुदिन्याची पाने, कोथिंबीर आणि आले मिक्सरमध्ये थोडे पाणी घालून बारीक करून घ्या. यानंतर ही पेस्ट एका भांड्यात घ्या आणि त्यात चिंचेची पेस्ट घाला.

आता त्यात हिंग, मीठ, काळी मिरी पावडर,बडीशेप, आमचूर पावडर, जिरेपूड, लिंबाचा रस आणि साखर मिसळा. यानंतर 2 कप पाणी घालून चांगले मिसळा. तुमचा जलजिरा (Jaljira Recipe) तयार आहे. एका काचेच्या ग्लासमध्ये हे मिश्रण टाकून त्यात बर्फाचे तुकडे घाला आणि बुंदी आणि पुदिन्याच्या पानांनी सजवा.

News Title –  Jaljira Recipe

महत्त्वाच्या बातम्या- 

“अपघाताच्या रात्री दारु..”; अल्पवयीन मुलाची धक्कादायक कबुली

लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधीच सर्वसामान्यांना मोठा झटका!

खरचं रविना टंडनने मद्यधुंद अवस्थेत वृद्धेला मारहाण केली? यासंदर्भात रवीना काय म्हणाली

उष्णतेपासून दिलासा मिळणार! हवामान विभागाकडून महत्वाची अपडेट

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! ‘या’ भागातील पाणीपुरवठा राहणार बंद