Jalna Accident News | जालना राजूर रोडवर तूपेवाडी फाट्याजवळ एका चारचाकी काळी पिवळ्या जीपचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या भीषण अपघातामध्ये 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर (Jalna Accident News ) हळहळ व्यक्त केली जात आहे.
आतापर्यंत विहीरीतून सात जणांचे मृतदेह ग्रामस्थांच्या मतदीने बाहेर काढण्यात आले आहेत. वारकरी पंढरपूर वरून घरी जात असताना हा अपघात झाला. यात सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातात 7 जणांचा मृत्यू
या जीपमध्ये एकूण 13 प्रवासी भाविक दाटीवाटीने बसले होते अशी माहिती समोर आली आहे. खडेश्वर बाबा मंदिर ते वसंत नगर ( राजूर जवळील ) येथे दुचाकी आणि काळी पिवळीचा हा अपघात झाला. चारचाकी वाहन विहिरीत कोसळल्याने त्यातील 13 जण जखमी झाले आहेत. या विहिरीतून सात भाविकांचे मृतदेह काढण्यात आले आहेत.
तर, जखमींना जालना येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघातानंतर (Jalna Accident News ) जालन्यातली चंदनझिरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने विहीरीत बुडालेल्या या जीपमधील नागरिकांना बाहेर काढण्यात आलं.
पंढरपूरवरुन येताना भीषण अपघात
या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जालन्यावरून राजुरकडे जाताना तुपेवाडी शिवारामध्ये दुचाकी समोर आल्याने जीप चालकाचं (Jalna Accident News ) नियंत्रण सुटलं आणि जीप थेट विहिरीत कोसळली.यात 7 जणांचा मृत्यू झाला आहे.
या प्रकरणी आमदार रोहित पवार यांनी ट्वीट केलं आहे. “जालना जिल्ह्यातील तुपेवाडी फाट्याजवळ प्रवासी जीप विहिरीत कोसळून 7 वारकऱ्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याचं वृत्त अत्यंत विषण्ण करणारं आहे. मी त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. मृत्यू झालेल्या वारकऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि या दुर्घटनेतील जखमी वारकरी लवकर बरे व्हावेत, ही प्रार्थना!”, असं ट्वीट रोहित पवार यांनी केलंय.
News Title : Jalna Accident News 7 people died
महत्त्वाच्या बातम्या-
चार वर्षांच्या संसारानंतर हार्दिक-नताशा विभक्त; घटस्फोटानंतर नताशाला किती रक्कम मिळणार?
घराबाहेर पडण्यापुर्वी ही बातमी नक्की वाचा!
आज ‘या’ राशींना सूर्यदेवाच्या कृपेने मोठा धनलाभ होणार!
“तुला लई प्रेम असेल तर देवेंद्र फडणवीसांसोबत लग्न कर”, मनोज जरांगेंचं प्रसाद लाड यांना प्रत्युत्तर
अभिषेकने केला नवा खुलासा, म्हणाला ‘ज्याच्यावर ती प्रेम करते त्यासाठी…’