सर्वात मोठी बातमी! जालन्यात रावसाहेब दानवेंचा दारुण पराभव; कल्याण काळे विजयी

Jalna Lok Sabha Result | महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघातील निकाल आज जाहीर झाला आहे. आज सकाळी 8 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली. अशात जालना लोकसभा मतदार संघात भाजपला मोठा धक्का बसला आहे. येथे भाजप उमेदवार रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला आहे.

कॉँग्रेसचे कल्याण काळे विजयी

जालना येथे कॉँग्रेस उमेदवार कल्याण काळे यांचा 65 हजार मतांच्या फरकाने विजय झाला आहे. गेल्या 20 वर्षांपासून दानवे हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. यावेळी कल्याणराव यांच्या रुपात त्यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिलेले होते. त्यातच मराठा आंदोलक जरांगे पाटील यांच्या भूमिकेमुळे देखील जालन्यात राजकारणावर प्रभाव पडला.

सुरुवातीला या निवडणुकीत रावसाहेब दानवे यांचे पारडे जड मानले जात होते. पण ही जागा जिंकण्यासाठी महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी पूर्ण ताकद पणाला लावली होती. याचा फायदा महाविकास आघाडीला झाला आहे.

रावसाहेब दानवे यांचा पराभव

जालन्यात कल्याणराव काळे यांचा मोठा विजय झाला आहे.जालना लोकसभा मतदारसंघांमध्ये जालना जिल्ह्यातील जालना, बदनापूर, भोकरदन तर छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातील सिल्लोड, फुलंब्री ,पैठण या एकूण सहा विधानसभा क्षेत्राचा समावेश आहे.

1999 मध्ये काँग्रेसचे उमेदवार ज्ञानदेव बांगर यांचा पराभव करीत रावसाहेब दानवे हे प्रथमच खासदार म्हणून निवडून गेले. त्यानंतर सलग पाच वेळा रावसाहेब दानवे जालना लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. या निवडणुकीत मात्र त्यांचा पराभव झाला आहे.

News Title : Jalna Lok Sabha Result 2024 Kalyan Kale wins

महत्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! वायनाड आणि रायबरेली या दोन्ही जागांवर राहुल गांधींचा दणदणीत विजय

रायगडने राखली अजित पवारांची लाज; 4 पैकी याच मतदारसंघात उघडलं विजयाचं खातं

महाराष्ट्रातील धक्कादायक निकालावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया!

फडणवीसांना जोर का झटका! माढयात मोहिते पाटील विजयी पथावर

भाजपवाले कोणाचेच नाहीत; संजय राऊतांच विधान चर्चेत