जालन्यात रावसाहेब दानवेंचं टेंशन वाढलं! कॉँग्रेस उमेदवाराची जोरदार आघाडी

Jalna Lok Sabha Result | महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघातील निकाल आज जाहीर होणार आहे. आज सकाळी 8 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. अशात जालना लोकसभा मतदार संघात भाजप उमेदवार रावसाहेब दानवे यांचं टेंशन वाढलंय. येथे कॉँग्रेस उमेदवार कल्याण काळे यांनी तब्बल 6 हजारांनी आघाडी घेतली आहे. कल्याण काळे सध्या 72 हजार 634 मतांनी आघाडीवर आहेत.

रावसाहेब दानवे पिछाडीवर

तर, दुसरीकडे रावसाहेब दानवे 67, 132 मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे भाजपसाठी हा धक्का मानला जात आहे. जालना मतदारसंघात 1992 मध्ये पहिल्यांदा सार्वत्रिक निवडणूक झाली, तेव्हा काँग्रेसचे हनुमंतराव गणेशराव वैष्णव खासदार म्हणून निवडून आले. आता यावर्षी कॉँग्रेसच्या उमेदवाराने आघाडी घेतल्याचं चित्र दिसून येतंय.

2019 मध्ये जालना लोकसभा मतदारसंघात 23 एप्रिल रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान झाले. त्यावेळी 64.50 टक्के मतदान झाले. या मतदारसंघात 2014 च्या तुलनेत 2019 मध्ये मतदानाची टक्केवारी दोन टक्क्यांनी कमी झाली. या जागेवर भाजपचे नेते रावसाहेब दानवे, काँग्रेसचे विलास औताडे आणि वंचित बहुजन आघाडीचे शरदचंद्र वानखेडे यांच्यात तिरंगी लढत झाली होती.

रावसाहेब दानवे vs कल्याण काळे

यावेळी देखील भाजपने दानवे यांना तिकीट दिलंय. तर, कॉँग्रेसकडून (Jalna Lok Sabha Result) येथे कल्याण काळे उभे राहिले आहेत. सध्या कॉँग्रेसने 6 हजारांची लीड घेतल्याची माहिती मिळत आहे.भाजपसाठी हा धक्का मानला जात आहे.

News Title : Jalna Lok Sabha Result 2024 

महत्वाच्या बातम्या-

मोदींची लाट ओसरली?; महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशने भाजपचं टेन्शन वाढवलं

शरद पवारांचा जलवा; 10 पैकी 10 जागांवर जोरदार मुसंडी

पुण्यात मतमोजणी सुरु असताना घडला धक्कादायक प्रकार!

अजित पवारांना मोठा धक्का, बारामतीही हातातून जाणार?

लोकसभा निकालाच्या भीतीने शेअर मार्केटमध्ये मोठे बदल; पुढे काय होणार?