बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

माहेरी गेलेल्या बोयकोला परत आणा म्हणत तरुण चक्क टॉवरवर चढला!

जालना | ही गोष्ट तिथेच का ठेवली? अहो हे इथच का ठेवलं? कामावरुन यायला उशीरच का झाला?. अशा या ना त्या कारणांवरून बायको नवऱ्याशी सतत भांडत असते. हीच बायको माहेरी जाताना सगळ्यात आनंदी कोण होत असेल तर नवरा असतो. तिला माहेरी सोडूनही येतो. माझी काळजी करु नको आरामात ये असंही तो तिला सांगतो.

बायको गावी गेली की मज्जा असते असं म्हणतात. जालन्यात मात्र यापेक्षा अजब प्रकार घडलाय. शोलेच्या धर्मेंद्रने ज्या स्टाईलने बंसतीसाठी जी ट्रिक हल्ली सगळेजण वापरतात. हिच स्टाईल जानल्यातील एका पतीने बायकोचा विरह सहन होत नसल्याने तिला परत बोलवण्यासाठी वापरली आहे.

या नवऱ्याचं नाव आहे गणपत बकाल. ही घटना जालन्यातील बदनापूर तालुक्यातील दाभाडीमध्ये घडली. गणपत याची बायको माहेरी गेली आहे. तीच्या जाण्यानं गणपतला तिची आठवण येत होती. बायकोच्या आठवणीत त्यांन दारु पिली. बायकोला परत बोलवण्यासाठी त्यांनं डाॅयरेक्ट मोबाईल टाॅवरचा उपयोग केला आणि तो टाॅवरवर चढला. माहेरी गेलेल्या बायकोला परत आणा आणि घरकुल द्या, अशी मागणी तो टाॅवरवर चढून करू लागला.

त्यांच्या या मागणीमुळे टाॅवरजवळ बघ्यांनी गर्दी केली होती. काही सर्तकांनी अग्निशामक दलाला बोलवलं. यानंतर त्यांनी गणपतला उतरण्यासाठी तब्बल चार तास विनवणी केली. अखेर चार तासानंतर गणपत खाली येण्यास तयार झाला. त्यांच्या या शोले स्टाईलची महाराष्ट्ररभर चर्चा होत असून व्हिडीओ ही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

थोडक्यात बातम्या

उद्धव ठाकरेंचा आणखी एक निर्णय एकनाथ शिंदेंकडून मागे, आरे मेट्रो कारशेडचा मार्ग मोकळा

तसाच पाऊस आणि पडत्या पावसात तशीच सभा, शरद पवारांप्रमाणे आदित्य ठाकरेही लोकांची मनं जिंकणार?

चित्रा वाघ यांनी टाकलेल्या हॉटेलमधील ‘त्या’ व्हिडीओवरून नाना पटोले भडकले, दिला ‘हा’ गंभीर इशारा

राष्ट्रपती निवडणुकीचा आज निकाल, द्रौपदी मुर्मू 15 वर्षांपूर्वीप्रमाणे इतिहास रचणार?

शरद पवारांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीचे विभाग आणि सेल बरखास्त

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More