Diabetes रुग्णांसाठी ‘हे’ फळ वरदानच, पावसाळ्यात आवर्जून खाल्ले जाते!

Jambhul Benefits for Diabetes | सध्याच्या घडीला मधुमेह असणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. अगदी शाळेतील मुलांना देखील मधुमेह असल्याचे निदान होत आहे. ही चिंता वाढवणारी बाब आहे. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे बनले आहे. आपल्या आहारावर यासाठी लक्ष देणे गरजेचे आहे. ज्या व्यक्तींना मधुमेह आहे, त्यांनी (Jambhul Benefits for Diabetes) पावसाळ्यात जांभूळ हे फळ आवर्जून खाल्ले पाहिजे.

सध्या बाजारात जांभूळ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहे. आंबट गोड चवीची जांभळे खाण्याची एक वेगळीच मज्जा असते. याचा रंगही खूप आकर्षक असतो. जांभळामध्ये पाणी, प्रथिने, लिपिड्स (फॅट्स), कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम, व्हिटॅमिन सी, थायामिन, रिबोफ्लेविन, नियासिन, व्हिटॅमिन बी-6, व्हिटॅमिन ए यासारखी पोषक सत्व असतात.

याचा आपल्या शरीराला खूप फायदा होतो. जांभूळ खाण्याचे (Jambhul Benefits for Diabetes)आश्चर्यकारक फायदे आहेत. हाय फायबर आणि कमी कॅलरी असणारा जांभूळ वारंवार होणारी क्रेविंग देखील कमी करते.यामुळे वजन कमी करण्यास खूप मदत होते. याचबरोबर त्याचे इतरही अनेक फायदे आहेत.

जांभूळ खाण्याचे फायदे

लो कॅलरी फूड : जांभूळ हे लो कॅलरी फूड असून त्यात जास्त प्रमाणात फायटोकेमिकल्स असतात. तसेच फ्रक्टोज आणि ग्लुकोज कमी प्रमाणात आढळतात. यामुळे शरीरातील (Jambhul Benefits for Diabetes)अतिरिक्त कॅलरीज वाढण्याचा धोका कमी होतो आणि वजन कमी होण्यासही मदत होते. .

रक्तामधील साखरेची पातळी नियंत्रणात राहते : जांभूळ खाल्ल्याने कार्बोहायड्रेट्सचे उर्जेमध्ये रूपांतर होण्यास मदत होते. कमी ग्लायसेमिक इंडेक्समुळे रक्तातील साखर नियंत्रित ठेवता येते. यामुळे ज्या व्यक्तींना मधुमेह आहे त्यांनी जांभूळ आवर्जून खायला हवे.

जांभळामध्ये पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. यातील पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित करते आणि व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. तसेच, कमी कॅलरी आणि जास्त फायबरमुळे वजन कमी करण्यासाठी जांभळाचे सेवन उपयुक्त ठरते. वजन कमी केल्याने मधुमेह नियंत्रित करणे (Jambhul Benefits for Diabetes)सोपे पडते.

त्वचेसाठी लाभदायक : जांभूळमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते.यामुळे त्वचेवर फ्री रॅडिकल्सचा प्रभाव कमी होतो. यामध्ये असलेले व्हिटॅमिन सीचे प्रमाण त्वचेतील कोलेजन वाढवून त्वचेची लवचिकता टिकवून ठेवते.

News Title – Jambhul Benefits for Diabetes patient

महत्त्वाच्या बातम्या-

पुण्यातील पुरग्रस्तांसाठी दिलासादायक बातमी; सरकार देणार आर्थिक मदत

एचडीएफसी बँकेचा मोठा धक्का; ऑनलाईन पेमेंट सेवा होणार बंद?

ठरलं तर! ‘या’ दिवशी सत्ताधारी व विरोधक प्रचाराचा नारळ फोडणार

पुण्यात आणखी एक हिट अँड रन; पोलीस चौकीसमोरच कारनं दुचाकीला नेलं फरफटत

ठाकरेंच्या उमेदवाराची करामत!, विनेश फोगाटला निकालाआधीच दिलं सिल्व्हर मेडल