नवी दिल्ली | दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात पोलिसांनी विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. जामिया काॅर्डेनिशन समितीनं हा व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. मात्र, या व्हिडीओची अधिकृतरित्या पृष्टी झालेली नाही.
व्हिडीओमध्ये विद्यार्थी विद्यापीठाच्या वाचनालयात शांतपणे वाचन करताना दिसत आहे. मात्र, अचानक तेथे पोलीस येऊन थेट विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात सुरुवात करतात. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच यावरुन केंद्र सरकारवर टीका केली जात आहे.
वाचनालयातील सीसीटीव्ही फुटेजचा हा व्हीडिओ आहे. जामिया काॅर्डेनिशन समितीनं हा व्हिडीओ शेअर करताना दिल्ली पोलिसांना टॅग केलं आहे. तसेच पोलिसांच्या क्रुरतेचा एक्सक्लुझिव्ह व्हिडीओ असं कॅपशन दिलं आहे.
दरम्यान, नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात आंदोलन करताना जामियाच्या विद्यार्थ्यांनी हिंसा केल्याचा आरोप आहे. तसेच पोलीस आणि गाड्यांवर दगडफेक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
Exclusive CCTV Footage of Police Brutality in Old Reading Hall, First floor-M.A/M.Phill Section on
15/12/2019
Shame on you @DelhiPolice @ndtvindia @ttindia @tehseenp @RanaAyyub @Mdzeeshanayyub @ReallySwara @ANI @CNN @ReutersIndia @AltNews @BBCHindi @the_hindu @TheQuint @BDUTT pic.twitter.com/q2Z9Xq7lxv— Jamia Coordination Committee (@Jamia_JCC) February 15, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
पवार साहेबांना ओळखायला दहा जन्म घ्यावे लागतील- धनंजय मुंडे
“परदेशी कन्येपासून झालेला राहुल गांधींचा जन्म देशासाठी मोठी चूक”
महत्वाच्या बातम्या-
भौतिक सुख वाढलं तरी लोक आंदोलन करत आहेत- मोहन भागवत
शरद पवारांकडून नाशिक दौरा अचानक रद्द; उद्या राष्ट्रवादीच्या 16 मंत्र्यांची महत्वाची बैठक
कारवाई केली तर इंदुरीकरांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहू- सुरेश धस
Comments are closed.