जमावाकडून मशिदीबाहेरच पोलीस अधिकाऱ्याची दगडाने ठेचून हत्या

Photo- ANI

जम्मू काश्मीर | जमावानं वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्याची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना जम्मू काश्मीरच्या नौहट्टा भागात घडलीय. 

मोहम्मद आयुब पंडीत असं या पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी त्यांच्या हत्येला दुजोरा दिला आहे.

नोहट्टा भागातील एका मशिदीबाहेर सुरक्षा व्यवस्थेसाठी ते तैनात होते, त्यावेळी काल रात्री उशिरा हा प्रकार घडला. यानंतर नौहट्टा भागात तणावाचं वातावरण आहे