Assembly Election Results 2024 | आज 8 ऑक्टोबररोजी जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. हरियाणामध्ये पोस्टल मतमोजणीला सुरूवात झाली असून पहिला कल हाती आला आहे. काँग्रेस 5 तर भाजप 1 जागांवर येथे आघाडीवर दिसत आहे. निकाल जाहीर होण्यापूर्वीच कॉँग्रेसकडून जल्लोष करण्यात येत आहे. तर, भाजपकडूनही एकतर्फी विजयाचा दावा केला जातोय. (Assembly Election Results 2024)
आज जम्मू आणि काश्मीरमधील विधानसभेच्या 90 जागांसाठी मतमोजणी सुरू झाली आहे. या निवडणुकीचे निकाल 2019 मध्ये कलम 370 रद्द केल्यानंतर केंद्रशासित प्रदेशात पहिले निवडून आलेले सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा करेल. येथे काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्स आघाडी, पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात मुख्य लढत आहे.
जम्मू काश्मिर व हरियाणात मतमोजणीला सुरुवात
जम्मू-काश्मीरमध्ये शेवटच्या निवडणुका 2014 मध्ये झाल्या होत्या. त्यामुळे ही निवडणूक महत्वाची मानली जात आहे. येथे 90 जागांसाठी 873 उमेदवार उभे आहेत. यावेळी 63.45 टक्के मतदान झाले असून हे 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत नोंदवलेल्या 65.52 टक्क्यांपेक्षा कमी आहे. (Assembly Election Results 2024)
दुसरीकडे हरियाणामधील 90 जागांसाठी 464 अपक्ष आणि 101 महिलांसह एकूण 1,031 उमेदवार रिंगणात आहेत. भाजपने येथे विजयाचा दावा केला आहे. मागील दहा वर्षांपासून हरियाणा येथे भाजपची सत्ता आहे. हरियाणामध्ये काँग्रेस, भाजप आणि आम आदमी पार्टीशिवाय जेजेपीही निवडणुकीच्या रिंगणात आहे.
‘या’ उमेदवारांकडे असणार सर्वांचं लक्ष
मुख्यमंत्री सैनी (लाडवा)
विरोधी पक्षनेते हुड्डा(गढी सांपला-किलोई)
इनेलोचे अभय चौटाला (ऐलनाबाद)-
दुष्यंत चौटाला (उचाना कलां)
भाजपचे अनिल विज(अंबाला कँट)
ओपी धनखर (बादली)
आपचे अनुराग ढांडा (कलायत)
काँग्रेसच्या विनेश फोगट (जुलाना) (Assembly Election Results 2024)
News Title : Jammu-Kashmir and Haryana Assembly Election Results 2024
महत्वाच्या बातम्या-
मुंबई म्हाडाच्या 2030 घरांची आज सोडत, घर मिळालं की नाही ते ‘असं’ करा चेक
नवरात्रीचा आज सहावा दिवस, देवी कात्यायनी ‘या’ राशींवर धरणार कृपेचे छत्र!
रेल्वे विभागात नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज
… तर त्यांना जाळ्या नसलेल्या इमारतींवरून उड्या मारायला लावल्या पाहिजेत; राज ठाकरेंचा टोला