Jammu Kashmir Army Vehicle Accident | जम्मू काश्मिरच्या पूंछ जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. मंगळवारी सायंकाळी येथे भारतीय लष्कराची एक गाडी 300 फुट दरीत कोसळली. या गाडीचा मेंढरच्या बलनोई परिसरात रस्ता चुकला होता. यानंतर ही गाडी खोल दरीत कोसळली.यामध्ये काही सैनिक जखमी झाले असून 5 जवानांचा जागीच मृत्यू झालाय. रात्री उशिरापर्यंत येथे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं. (Jammu Kashmir Army Vehicle Accident)
जखमी सैनिकांवर सध्या उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अपघात झाला त्यावेळी गाडीतून 8 ते 9 जवान प्रवास करत होते. यातल्या 5 जवानांचा मृत्यू झाला आहे, तर इतर जवानांवर उपचार सुरू आहेत. ही गाडी नीलम मुख्यालयापासून बलनोई घोरा पोस्टच्या दिशेनं जात होती. मात्र, घोरा पोस्टजवळ जाताच वाहनाला अपघात झाला.
जम्मू काश्मिरमध्ये घडली दुर्घटना
लष्करची ही गाडी 300 ते 350 फूट खोल दरीत कोसळली. अपघाताची माहिती मिळताच क्यूआरटी टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली आणि बचावकार्याला सुरुवात झाली. भारतीय सैन्यदलाच्या व्हाइट नाईट कोर्प्सने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर या घटनेबाबत माहिती दिली आहे. (Jammu Kashmir Army Vehicle Accident)
“व्हाइट नाइट कॉर्प्सचे जवान पूंछ सेक्टरमध्ये ऑपरेशनल ड्युटीवर होते. त्यांच्या वाहनाला अपघात झाला असून यात 5 जिगरबाज जवांनाचा मृत्यू झाला आहे. याबाबत आम्ही संवेदना व्यक्त करतो. बचावकार्य सुरू आहे. जखमी जवानांवर उपचार सुरू आहेत.”, अशी पोस्ट व्हाइट नाईट कोर्प्सने केली आहे.
5 जवानांचा जागीच मृत्यू
पूंछ जिल्ह्यातील मेंढर उपविभागातील मानकोट सेक्टरमधील बालनोई भागात ही दुर्घटना घडली. या प्रकरणी देशभरातून शोक व्यक्त केला जातोय. जखमी जवानांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उपचारासाठी लष्करी रुग्णालयात पूंछमध्ये पाठवण्यात आलंय. (Jammu Kashmir Army Vehicle Accident)
All ranks of #WhiteKnightCorps extend their deepest condolences on the tragic loss of five brave soldiers in a vehicle accident during operational duty in the #Poonch sector.
Rescue operations are ongoing, and the injured personnel are receiving medical care.@adgpi…
— White Knight Corps (@Whiteknight_IA) December 24, 2024
News Title : Jammu Kashmir Army Vehicle Accident
महत्वाच्या बातम्या –
विनोद कांबळींच्या मदतीसाठी एकनाथ शिंदे सरसावले, दिलं मोठं आश्वासन
देवी लक्ष्मी ‘या’ राशींवर करणार धनवर्षाव, मनातील इच्छा देखील होतील पूर्ण!
तुम्हाला प्रीमियरच्या संदर्भात पोलिसांची परवानगी नव्हती?; चौकशी दरम्यान अल्लू अर्जूनचा खुलासा
पुणे-नगर रस्ता नव्हे हा तर ‘मृत्यूचा महामार्ग’; वर्षभरात एवढ्या लोकांनी गमावले प्राण!
क्रिकेटपटू, उद्योगपती, अभिनेता…कोणालाच नाही सोडलं; ‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या अफेअरनं खळबळ!