Jamun Benefits | पावसाळ्यात जांभूळ हे फळ आवर्जून खाल्ले जाते. सध्या बाजारात जांभूळ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते आहे. आंबट गोड चवीची जांभळे खाण्याची एक वेगळीच मज्जा असते. याचा रंगही खूप आकर्षक असतो. जांभळामध्ये पाणी, प्रथिने, लिपिड्स (फॅट्स), कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम, व्हिटॅमिन सी, थायामिन, रिबोफ्लेविन, नियासिन, व्हिटॅमिन बी-6, व्हिटॅमिन ए यासारखी पोषक सत्व असतात.
याचा आपल्या शरीराला खूप फायदा होतो. जांभूळ खाण्याचे (Jamun Benefits) आश्चर्यकारक फायदे आहेत. हाय फायबर आणि कमी कॅलरी असणारा जांभूळ वारंवार होणारी क्रेविंग देखील कमी करते.यामुळे वजन कमी करण्यास खूप मदत होते. याचबरोबर त्याचे इतरही अनेक फायदे आहेत.
जांभूळ खाण्याचे फायदे
लो कॅलरी फूड : जांभूळ हे लो कॅलरी फूड असून त्यात जास्त प्रमाणात फायटोकेमिकल्स असतात. तसेच फ्रक्टोज आणि ग्लुकोज कमी प्रमाणात आढळतात. यामुळे शरीरातील अतिरिक्त कॅलरीज वाढण्याचा धोका कमी होतो आणि वजन कमी होण्यासही मदत होते. .
रक्तामधील साखरेची पातळी नियंत्रणात राहते : जांभूळ खाल्ल्याने कार्बोहायड्रेट्सचे उर्जेमध्ये रूपांतर होण्यास मदत होते. कमी ग्लायसेमिक इंडेक्समुळे रक्तातील साखर नियंत्रित ठेवता येते. यामुळे ज्या व्यक्तींना मधुमेह आहे त्यांनी जांभूळ आवर्जून खायला हवे.
दातांसाठी फायदेशीर : अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांनी समृद्ध असलेले जांभूळ खाल्ल्याने दातांचा पिवळेपणा दूर होण्यास मदत होते. शिवाय कॅव्हिटीपासूनही आराम मिळतो. जांभूळशिवाय त्याची पाने आणि बियांची पावडर देखील खूप फायद्याची ठरते.
त्वचेसाठी लाभदायक : जांभूळमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते.यामुळे त्वचेवर फ्री रॅडिकल्सचा प्रभाव कमी होतो. यामध्ये असलेले व्हिटॅमिन सीचे प्रमाण त्वचेतील कोलेजन वाढवून त्वचेची लवचिकता टिकवून ठेवते.
हृदयासाठी फायदेशीर : जांभूळ खाल्ल्याने (Jamun Benefits) शरीराला पोटॅशियम मिळते. यामुळे उच्च रक्तदाबाचा धोका टाळता येतो. तसेच हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघात टाळण्यासही यामुळे मदत होते.
News Title – Jamun Benefits
महत्त्वाच्या बातम्या-
“थापांचा नाही तर मायबापांचा अर्थसंकल्प, दिलेलं आश्वासन पूर्ण करू”
“लोकसभा अध्यक्षांनी राहुल गांधींचा माईक बंद केला”, नवनिर्वाचित खासदारांचा गंभीर आरोप
आचार्य चाणक्यांनी सांगितलं विवाह आणि वयाचं महत्त्व!
अजित पवारांच्या बजेटमध्ये कुणाला काय मिळालं?; A To Z माहिती वाचा एका क्लिकवर
वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार, अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा