Top News विधानसभा निवडणूक 2019

“बापट साहेब तुमच्या पीएला सांभाळा”

Loading...

पुणे | बसचा कंडक्टर ड्रायव्हर होऊ शकतो,  असिस्टंट प्रोफेसरचा प्रोफेसर होऊ शकतो तर खासदाराचा पीए खासदार का होऊ शकत नाही? गिरीश बापट साहेब तुमच्या पीएला सांभाळा, असा शब्दात लडाखचे खासदार जमयांग नामग्याल यांनी गिरीश बापट यांना कोपरखळी मारली.

पुण्यात कोथरुड येथे कलम 370 वर बोलण्यासाठी लडाखचे खासदार नामग्याल यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. नामग्याल पूर्वी खासदारचे पीए होते. त्यानंतर ते स्वत: खासदार झाले आहेत. त्यावरुन त्यांनी हे वक्तव्य केलं.

Loading...

माझी आणि बापट साहेबांची भेट संसदेत झाली होती. यावेळी मी खासदार कसा झालो? असा प्रश्न त्यांना पडला होता. एक युवा पीए खासदार होतो तर तुम्हा जेष्ठांना त्रास का होतो? मात्र तुम्ही तुमच्या पीएला सांभाळा, असं नामग्याल म्हणाले.

दरम्यान, नामग्याल यांनी वर्तवलेलं भाकीत खरं होतं की काय अशी परिस्थिती आहे. कारण गिरीश बापट यांची निवडणूक व्यूहरचना सांभाळणाऱ्या सुनील माने यांनी नुकताच भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. ते शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी आग्रही होते.

Loading...

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

Loading...

 

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या