बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर ‘या’ जिल्ह्यात 3 दिवसांचा जनता कर्फ्यू

जळगाव | जळगावात कोरोना रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाकडून शुक्रवार ते रविवार दरम्यान जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे.

जनता कर्फ्यू दरम्यान शहरातील अत्यावशक सुविधे व्यतिरिक्त इतर व्यवसायिक दुकाने आणि इतर अस्थापना बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले आहेत. तरीही जनता कर्फ्यू दरम्यान इतर आस्थापने आणि दुकाने सुरू असल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. कोणत्याही भाजीपाला मार्केट मध्ये किंवा शहरातील रस्त्यांवर देखील गर्दी झाल्यास महापालिकेकडून कारवाई करण्यात येणार आहे.

जनता कर्फ्यू हा जनतेने स्वयंस्फूर्तीने पाडायचा असला तरी या कर्फ्यूमध्ये प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश मनपा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

दरम्यान, औरंगाबादमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय. त्यामुळे औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. वेरुळ-अजिंठा लेणीसह औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळं 4 एप्रिलपर्यंत बंद राहणार आहेत.

थोडक्यात बातम्या-

संजना नाही तर आता ‘या’ माझ्या जोडीदार- हर्षवर्धन जाधव

मी मराठा म्हणून बोलत नाही; जगात जात हा प्रकार नसता तर…- उदयनराजे भोसले

“वाघीण जखमी होते तेव्हा ती अधिक आक्रमक आणि हिंसक होते”

चेअरमन, सोसायटीवर लक्ष ठेवा, अन्यथा…; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरीच्या आयुक्तांचा महत्त्वाचा इशारा

#Corona पुण्यात आजही कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ; जाणून घ्या सविस्तर आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More