जेडीयू-भाजप घरोब्यामुळे आमदार कपिल पाटलांची पंचाईत

Photo- Twitter

मुंबई | जेडीयू-भाजप घरोब्यामुळे महाराष्ट्रातील शिक्षक आमदार कपिल पाटील यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. त्यांनी नुकताच आपला लोकभारती पक्ष जेडीयूमध्ये विलीन केला होता.

बिहारमध्ये कमी झालेलं शेतकरी आत्महत्याचं प्रमाण पाहून आम्ही प्रभावित झालो होतो. तसेच लाचखोरमुक्त प्रशासन आणि आरएसएसमुक्त भारत या त्यांच्या मोहिमांमुळे आमचा त्यांच्याविषयी आदर वाढला होता. मात्र नितीश कुमार यांच्या या निर्णयामुळे आम्हाला धक्का बसला आहे, असं कपिल पाटील म्हणाले.

दरम्यान, लवकरच बैठक बोलावून यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असंही ते म्हणाले.