Janhvi Kapoor | बॉलीवुड अभिनेत्री जान्हवी कपूरबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. अभिनेत्रीची अचानक तब्येत बिघडल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. सध्या जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) हिच्यावर उपचार सुरू आहेत.
जान्हवीच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीने तिच्या तब्येतीबद्दल माहिती दिली आहे. जान्हवी कपूरला अन्नातून विषबाधा झालीये. तिची तब्येत अधिकच बिघडत असल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. सध्या जान्हवी कपूरवर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या देखरेखीखाली सध्या अभिनेत्री उपचार घेत आहे.
अभिनेत्री जान्हवी कपूरची तब्येत बिघडली
रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर तिची तब्येत नेमकी कशी आहे, याबाबत अद्याप कोणतीच माहिती समोर आली नाहीये. जान्हवीच्या (Janhvi Kapoor) तब्येतीबद्दल कळताच चाहत्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. ती लवकरात लवकर बरी व्हावी, यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.
जान्हवीने अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात प्रचंड धमाल-मस्ती केली. अनंत आणि राधिका यांच्या लग्न सोहळ्यातील प्रत्येक कार्यक्रमात ती बॉयफ्रेंड शिखर पहाडिया याच्यासोबत दिसून आली.
View this post on Instagram
जान्हवी कपूरवर उपचार सुरू
जान्हवी कपूर ही शिखर पहाडिया याला काही दिवसांपासून डेट करत आहे. दोघे लवकरच लग्न करणार असल्याचे सातत्याने सांगितले जात आहे. अनंत आणि राधिकाच्या लग्न सोहळ्यात जान्हवी आणि शिखर यांनी सोबत डान्स देखील केला होता. याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता.
अशात जान्हवी (Janhvi Kapoor) तिच्या हेल्थमुळे चर्चेत आलीये. आता तब्येत खराब असल्याने जान्हवी कपूर हिला थेट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. तिच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास ती तिच्या आगामी ‘उलझ’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे.
News Title – Janhvi Kapoor Admitted To The Hospital
महत्वाच्या बातम्या-
“अंगणवाडी सेविका तुमच्या बहिणी नाहीत का?”; योजनेसाठी काम करण्यास अंगणवाडी सेविकांचा नकार
उत्तर प्रदेशात रेल्वेचा भीषण अपघात! 10 ते 12 डब्बे रुळावरून घसरले, मृतांचा आकडा समोर
महिलांनो ‘या’ दोन गोष्टींकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका; अन्यथा होऊ शकतो Breast Cancer
कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर!
कोकण किनारपट्टीला मुसळधार पावसाचा इशारा, मुंबईला देखील पाऊस झोडपणार