Janhvi Kapoor l अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) आणि बोनी कपूर (Boney Kapoor) यांची मुलगी जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) आपल्या अभिनयाने चित्रपटसृष्टीत (Film Industry) स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहे. श्रीदेवीने आपल्या मुलींना खूप लाडाकोडात वाढवले. जान्हवीवर चांगले संस्कार करण्यासोबतच तिला योग्य वळणही लावले. श्रीदेवीप्रमाणेच तिच्या दोन्ही मुली अतिशय धार्मिक आहेत. मात्र, याच संस्कारी जान्हवीला एकदा एका मुलासोबत बेडरूममध्ये रंगेहाथ पकडण्यात आले होते. खुद्द जान्हवीनेच हा किस्सा एका मुलाखतीत सांगितला होता.
जान्हवी कपूर तिच्या चित्रपटांसोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही (Personal Life) चर्चेत असते. सध्या ती तिच्या आगामी ‘परम सुंदरी’ (Param Sundari) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत (Sidharth Malhotra) दिसणार आहे. ‘मिस्टर अँड मिसेस माही’ (Mr. and Mrs. Mahi) चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान तिने हा किस्सा सांगितला होता. एकदा वडिलांनी तिला एका मुलासोबत बेडरूममध्ये कसे पकडले आणि त्यानंतर तिला कशी शिक्षा केली, हे तिने सांगितले.
बेडरूममध्ये बॉयफ्रेंडसोबत पकडले :
जान्हवी म्हणाली, “आम्ही आमच्या जुन्या घरात राहत होतो तेव्हाची ही गोष्ट आहे. एकदा मी माझ्या एका मित्राला घरी बोलावले होते. त्यावेळी घरी कोणीही नव्हते आणि आम्ही दोघे बेडरूममध्ये बसून बोलत होतो. त्याचवेळी अचानक पप्पा घरी आले. मला काहीच सुचले नाही आणि मी त्याला दरवाजाऐवजी खिडकीतून खाली उडी मारायला लावली.”
Janhvi Kapoor l प्लॅन फसला! :
जान्हवी पुढे म्हणाली, “मला वाटले की तो खिडकीतून गेला तर पप्पांना कळणार नाही. पण वडिलांनी सर्व काही सीसीटीव्हीमध्ये (CCTV) पाहिले होते आणि माझा संपूर्ण प्लॅन फसला. यासाठी पप्पांनी मला शिक्षाही केली आणि नंतर घराच्या सर्व खिडक्यांना ग्रील लावले.”
जान्हवीचे वैयक्तिक आयुष्य आणि आगामी चित्रपट :
जान्हवीने ‘धडक’ (Dhadak) चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. लवकरच ती वरुण धवनसोबत (Varun Dhawan) ‘सनी संस्कार की तुलसी कुमारी’ (Sunny Sanskar Ki Tulsi Kumari) मध्ये दिसणार आहे. जान्हवीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर ती शिखर पहाडियाला (Shikhar Pahariya) डेट करत असल्याची चर्चा आहे. मात्र, दोघांनीही अद्याप त्यांच्या नात्याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. असे असले तरी, दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट होतात.