बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जनता कर्फ्यूबाबत रितेश-जेनेलियानं भारतीयांना केली विनंती; पाहा व्हिडीओ

मुंबई | आजच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन केलं आहे. मनोरंजन श्रेत्रातील कलाकारांनीही या जनता कर्फ्यूला पाठिंबा दिल्याचं चित्र दिसत आहे. अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया डिसूझा यांनाही ट्विटवरुन एक टिकटॉक व्हिडिओ पोस्ट करत घरातच राहण्याचे आवाहन आपल्या चाहत्यांना केलं आहे.

या व्हिडीओमध्ये रितेश, घरीच थांबा, ठणठणीत राहा, असं म्हणत आहे तर भारत करोनाशी लढा देत आहे, असं जेनेलिया म्हणते. त्यानंतर व्हिडिओच्या शेवटी दोघेही चेहऱ्यावर मास्क घालून नमस्कार करत आपल्या चाहत्यांना घरीच राहण्याची विनंती करताना दिसत आहे.

व्हिडिओच्या शेवटची राष्ट्रगिताची धून ऐकू येते. यामधून भारतासाठी हे इतकं करा असं सांगण्याचा प्रयत्न या दोघांनी केला आहे.

दरम्यान,रितेश आणि जेनेलियाच नाही तर पर्ण पेठे, स्पृहा जोशी यासारख्या मराठमोळ्या अभिनेत्रींनीही सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून चाहत्यांना घरीच थांबण्याचं आवाहन केलं आहे.

 

ट्रेंडिंग बातम्या-

चांगली बातमी | औरंगाबादच्या प्राध्यापक महिलेची 7 दिवसात कोरोनावर मात

कोरोना का पंचनामा, म्हणत मोदींनी शेअर केला कार्तिक आर्यनचा व्हिडीओ

महत्वाच्या बातम्या-

“मोदींनी केलेल्या आवाहनाची खिल्ली उडवू नका… माझे कुटुंब देखील कॉरन्टाईन”

संजय राऊत यांच्या ‘देवांनी मैदान सोडलं’ या अग्रलेखाचं काँग्रेसकडून जोरदार स्वागत

सोशल मीडियावरील ‘ते’ व्हिडीओ पाहून हर्षवर्धन पाटलांची लेक निराश

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More