पुणे महाराष्ट्र

1 जानेवारी हा सामाजिक गुलामगिरीतून मुक्त होण्याचा दिवस- प्रकाश आंबेडकर

कोरेगाव भिमा | एक जानेवारी हा या देशातील सामाजिक गुलामगिरीतून मुक्त होण्याचा दिवस आहे असं आम्ही मानतो, असं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेकर यांनी म्हटलं आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी कोरेगाव भीमा येथे जाऊन विजयस्तंभाला अभिवादन केलं. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं.

पेशवाईच्या काळात जी अस्पृश्यता पाळली जात होती त्या विरोधातील हा लढा होता. हा लढा यशस्वी झाला. तेव्हापासून सुरू झालेली ही सोशल मुव्हमेंट खऱ्या अर्थाने जोपर्यंत लोकशाही येत नाही तोपर्यंत कायम राहील, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह गृहमंत्री अनिल देशमुख आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडून कोरेगाव भीमा मधील विजय स्तंभाला आज सकाळी अभिवादन केलं. त्यावेळी ‘कोरेगाव भीमा विकास आराखड्यासाठी कोणतीही अडचण येऊन देणार नाही, असं अजित पवार म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

‘सरपंच पदाचा लिलाव म्हणजे…’; अण्णा हजारेंचं मोठं वक्तव्य

आयटीआयची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच आरोग्यमंत्र्यांनी दिल्या ‘या’ महत्त्वाच्या सूचना

कोरोना रुग्णांना वाचवण्यात भारत इतर देशांपेक्षा कितीतरी पटीने आघाडीवर- नरेंद्र मोदी

कोरेगाव भीमा विकास आराखड्यासाठी कोणतीही अडचण येऊ देणार नाही- अजित पवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या