Manoj Jarange | सगेसोयरेसह मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्या प्रमुख तीनही मागण्या मान्य झाल्या आहेत. सरकारच्या या निर्णयावर मंत्री छगन भुजबळांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. तसेच मराठा आरक्षणामुळे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागत असल्याचा आणि मागच्या दारातून मराठ्यांना आरक्षण दिले जात असल्याचा आरोप मंत्री छगन भुजबळ यांनी केलेला.
सरकारच्या निर्णयाविरोधात छगन भुजबळांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळांवर टीका केली आहे.
जरांगे पाटलांचा छगन भुजबळांना इशारा
आम्ही सर्व मिळून तुला बाहेर फेकतो. ओबीसीचे वाटोळे तू केले आहे. आम्ही ओबीसींचे वाटोळे होऊ देणार नाही. तू गप्प बस नाही टपकनवर जाशील. तुझे वय झाले आहे आणि या वयात एव्हडा लोड झेपत नाही. गप्प राहा, यडपाट माणूस आहे. कसे हे ओबीसीच्या हाताला लागले. ओबीसीचे वाटोळे करत आहे, असं म्हणत मनोज जरांगेंनी (Manoj Jarange Patil) मंत्री छगन भुजबळांवर निशाणा साधला आहे.
Manoj Jarange Patil | “तू गप्प बस नाही टपकनवर जाशील”
मला म्हणतो उपोषण करू नको, तू नको करू आंदोलन, गप्प पड एका जागी. तू माझ्या नादी लागू नको. तुझे वय झाले आहे. तुझ्या वयानुसार आम्ही तुझा आदर करू. तू गप्प बसला तर आम्ही तुझा शंभर टक्के आदर करू. पण गप्प बसला नाही तर तुला मी काही सोडत नाही, असा इशारा जरांगे यांनी भुजबळांना दिला आहे.
तुझं वय झालं आहे आणि या वयात एव्हडा लोड झेपत नाही. तू गप्प बस नाही तर टपकन वर जाशील असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय.
दरम्यान, मनोज जरांगे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेणार असल्याचं सांगितलं आहे. जे समाजासमोर बोंबलत आहेत, की मराठा समाजाला मुंबईत गेल्यानंतर काय मिळाले ते मी स्पष्ट करणार आहे. 70 वर्षात कोणी कोणी काय मिळु दिले नाही हे सांगणार आहे, असंही जरांगे म्हणालेत.
महत्त्वाच्या बातम्या-
अभिनेत्री पूनम पांडे निघाली जिवंत, सोशल मीडीयावर व्हिडीओ तूफान व्हायरल
मोठी बातमी! पूनम पांडे जिवंत आहे, स्वत: समोर येत केला मोठा खुलासा
“तो पैसा राजकीय पक्षांच्या फंडात…”, राज ठाकरेंचा खळबळजनक दावा
गोळीबार केल्याप्रकरणी भाजप आमदाराकडून मोठा खुलासा!
“राज ठाकरे मराठ्यांविरोधात कधी बोलायला लागले?”